PM Narendra Modi : पंतपधान नरेंद्र मोदी पुन्हा येणार महाराष्ट्र दौऱ्यावर; काय आहे कारण?

Share

कामगारांचे स्वप्न पूर्ण करणारा कोणता नवा प्रकल्प?

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) नुकतेच शुक्रवारी महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. यावेळी अनेक विकासकामांचे उद्घाटन तसेच काळाराम मंदिरात दर्शन, गोदावरीची आरती अशा अनेक गोष्टींमुळे त्यांनी महाराष्ट्राचे मन पुन्हा एकदा जिंकले. यानंतर पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. त्याला कारणही खास आहे. ३० हजार कामगारांचे स्वप्न पूर्ण करणारा देशातील सर्वात मोठा प्रकल्प सोलापुरातील रे नगर (Solapur News) येथे उभा राहणार आहे. याचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.

कामगारांचे शहर (Labour city) अशी सोलापूरची ओळख आहे. आधी सूतगिरणीमध्ये काम करणारे आता वस्त्रोद्योग, विडी उद्योग, बांधकाम अशा विविध क्षेत्रात हजारो कामगार सोलापुरात काम करत असतात. गरीबीमुळे या कामगारांना मोडक्या तोडक्या घरांमध्ये राहण्याशिवाय पर्याय नसतो. मात्र, या कामगारांचं स्वतःचं हक्काच्या घराचं स्वप्न साकार होताना पाहायला मिळत आहे. देशातील सर्वात मोठी कामगार वसाहत (Labour colony) सोलापुरातल्या रे नगर येथे साकारली जात आहे. या वसाहतीच्या लोकार्पणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः सोलापूरला येणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ९ जानेवारी २०१९ रोजी या प्रकल्पाचे शिलान्यास केले. जवळपास पाच वर्षानी पुन्हा मोदी आपला शब्द पूर्ण करण्यासाठी सोलापुरात येणार आहेत. आयुष्यभर झोपडपट्टीत जगणाऱ्या कामगारांना देखील स्वतःचं हक्काचं घर असावं, याच उद्दिष्टाने पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून ही घरे साकारली आहेत. सलग ४ वर्षे जवळपास १० हजार कामगारांनी मिळून रे नगरमध्ये हा भव्य प्रकल्प साकारला आहे. मागील दहा वर्षे केलेल्या नरसय्या आडम यांच्या प्रयत्नांना राज्य आणि केंद्र शासनाच्या मदतीमुळे मूर्त स्वरूप आले आहे. केवळ डोक्यावर छत नाही तर जगण्यासाठीच्या मूलभूत सोयी सुविधा देखील पुरवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

देशातील सर्वात मोठी कामगार वसाहत नेमकी कशी आहे?

३५० एकर परिसर, ८३४ इमारती, प्रत्येक इमारतीत ३६ असे एकूण ३० हजार फ्लॅट्स असणारी ही देशातील सर्वात मोठी कामगार वसाहत आहे. यासाठी एकूण ६० मेगावॅट विजेचे प्रकल्प काम सुरु, पैकी २० मेगावॅटचे काम पूर्ण झाले आहे. परिसरात ७ मोठ्या पाण्यच्या टाक्या ठेवण्यात येणार असल्याने २४ तास पाणी पुरवठा शक्य होणार आहे. परिसरात मलशुद्धीकरण केंद्र व स्वतंत्र घनकचरा व्यवस्थापन यंत्रणा असणार आहे. विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषदतर्फे शाळा, अंगणवाडीची सोय, खेळण्यासाठी क्रीडा मैदान, आरोग्यासाठी हॉस्पिटल, लोकांच्या रोजगारासाठी व्यवसाय देखील उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

Recent Posts

Prakash Mahajan : ‘या’ महिलांना माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देऊ नका!

मनसे नेते प्रकाश महाजन यांची मागणी मुंबई : राज्य सरकारने (State Government) 'माझी लाडकी बहीण'…

2 hours ago

Ambadas Danve : काय करायचे ते करा म्हणणाऱ्या अंबादास दानवेंची वरिष्ठांकडून कानउघडणी!

अखेर विधान परिषदेच्या सभापतींना पत्र लिहून व्यक्त केली दिलगीरी; सभागृहातही दिलगिरी व्यक्त करण्याची तयारी मुंबई…

2 hours ago

Eknath Shinde : दलाल अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत

'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेसाठी अडवणूक, दिरंगाई, पैशांची मागणी केल्यास अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करणार मुख्यमंत्री…

3 hours ago

Ashadi Wari : आषाढी वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांसाठी टोलमाफी

मुंबई : दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त (Ashadi Wari) राज्यभरातून लाखो वारकरी पंढरपूरकडे (Pandharpur) जातात. यंदाही १७…

3 hours ago