मुंबई: देशभरासह जगभरातील लोक २२ जानेवारीची प्रतीक्षा करत आहे. या दिवशी अयोध्येत श्रीरामांची प्राण प्रतिष्ठा केली जाणार आहे. याचा मोठा सोहळा पार पडणार आहे.
या सोहळ्यासाठी संपूर्ण अयोध्या शहर अतिशय भव्य दिव्य पद्धतीने सजवले आहे. या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींसह हजारो लोक सहभागी होणार आहेत.
सोहळ्यात सचिन तेंडुलकर आणि हरभजन सिंह सामील होणार आहे. तर विराट कोहली आणि रोहित शर्माही सामील होण्याची शक्यता आहे.
मात्र या सगळ्यात भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. त्याला प्राण प्रतिष्ठेचे निमंत्रण मिळाले आहे.
Former skipper MS Dhoni has been invited for Pran Pratishtha of Lord Rama at the Ram Temple in Ayodhya.#स्वागत_है_श्रीराम pic.twitter.com/YvMLU9EKnk
— Anuj Mishra (@anujmishra003) January 15, 2024
धोनीला ही आमंत्रण पत्रिका RSSचेसह प्रांत कार्यवाह धनंजय सिंह यांनी दिली. भाजपा प्रदेस संघटना महामंत्री कर्मवीर सिंहही यावेळी उपस्थित होते.
पद्मभूषण धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने २००७मध्ये टी-२० विश्वचषक आणि २०११मध्ये वनडे विश्वचषक जिंकला आहे.
धोनीने १५ ऑगस्ट २०२०मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. मात्र तो आतापर्यंत आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळत आहे.