Sunday, June 22, 2025

Nitesh Rane : अपघातग्रस्ताच्या मदतीला धावले आमदार नितेश राणे

Nitesh Rane : अपघातग्रस्ताच्या मदतीला धावले आमदार नितेश राणे

कणकवली : वैभववाडी तळेरे मार्गावर अपघातग्रस्त जखमी तरुणाला पाहून आमदार नितेश राणे यांनी (Nitesh Rane) आपला गाड्यांचा ताफा थांबवला आणि जखमी तरुणाची विचारपूस करून तात्काळ अम्ब्युलन्स मागवून त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.


नाधवडे येथील बैलगाडा शर्यतीला उपस्थित राहून आमदार नितेश राणे सायंकाळी कणकवलीच्या दिशेने येत होते. नाधवडे दूध डेअरीच्या नजीक राणे यांच्या गाड्यांचा ताफा आला असताना त्यांना रस्त्यात जखमी अवस्थेत विव्हळत पडलेला तरुण दिसला. त्याच्या मोटारसायकलला ठोकून अज्ञात वाहनाने पलायन केले होते.


अपघातग्रस्त तरुणाला पाहताच आमदार नितेश राणेंनी तात्काळ आपली गाडी थांबवून त्या तरुणाची विचारपूस केली. तात्काळ अम्ब्युलन्स मागवून त्या जखमी तरुणाला नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी पाठवून दिले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >