Tuesday, July 23, 2024
Homeताज्या घडामोडीJio-Airtel यूजर्सना लागणार झटका, तुम्ही वापरता का?

Jio-Airtel यूजर्सना लागणार झटका, तुम्ही वापरता का?

मुंबई: जिओ आणि एअरटेलमध्ये अनेकदा टक्कर पाहायला मिळते. मग ते प्लान्स असो वा नेटवर्क. प्रत्येक गोष्टीत दोन्ही कंपन्यांमध्ये टक्कर सुरू असते. त्यातच आता या दोनही कंपनींच्या ५जी यूजर्सना झटका लागू शकतो.

२०२४मध्ये काही महिन्यांनी जिओ आणि एअरटेलचा अनलिमिटेड ५जी डेटा प्लान संपवणार आहे. यासोबतच या प्लान्सची किंमत ५ ते १० टक्क्यांपर्यंत वाढवली जाऊ शकते.

नव्या रिपोर्टनुसार ४जी टॅरिफच्या मदतीने कंपन्या रेव्हेन्यू ग्रोथ वाढवण्यावर जोर देत आहेत. ऑक्टोबर २०२२मध्ये जिओ आणि एअरटेलने ५जी सर्व्हिस लाँच केली होती. यानंतर ४जी इंटरनेटच्या किंमतीत युजर्सना ५ जी इंटरनेट दिले जात आहे. मात्र आता अनलिमिटेड ५जी ऑफर लवकरच संपणार आहे. कारण दोनही कंपन्या ५जी सर्व्हिस प्लान्समध्ये बदल करण्याचा विचार करत आहेत.

दोन्ही कंपन्या भारतात ५जी बाबत सातत्याने काम करत आहे. जिओ आणि एअरटेलचे १२५ मिलियनहून अधिक युजर्स आहेत. २०२४मध्ये ५जी युजर्सची संख्या २०० मिलियन पार करू शकते. दरम्यान, मिळालेल्या रिपोर्टनुसार एअरटेल आणि जिओ आपल्या ५जी डेटा प्लान्समध्ये ५ ते १० टक्के वाढ करू शकते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -