साप्ताहिक राशिभविष्य, १४ जानेवारी ते २० जानेवारी २०२४
|
जमिनीच्या कामात यश
मकर : पूर्वी केलेल्या नियोजनाद्वारे कामे पूर्ण होत असलेली बघून आत्मविश्वासात वाढ होईल. विविध प्रकारच्या कामांना गती मिळून कामे पूर्णत्वाच्या मार्गावर राहतील. स्थावर मालमत्ता अथवा जमिनीच्या कामात यश लाभेल. नोकरीमध्ये वरिष्ठांची मर्जी संपादित करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. कामांमधील शिस्त पाळण्याची आवश्यकता तसेच आपले कामांमधील ज्ञान अद्ययावत ठेवण्याची आवश्यकता आहे. हाताखालील मंडळींचे सहकार्य अपेक्षेप्रमाणे मिळेल. मुला-मुलींच्या प्रश्नांकडे वेळीच लक्ष देणे क्रमप्राप्त ठरेल. त्यांच्या प्रगतीचा आढावा घेणे ठरेल. आर्थिक परिस्थिती ठीक राहील. काही वेळेस अचानक खर्चाच्या बाबी पुढे आल्यामुळे खर्च करावा लागेल.
|
 |
महत्त्वाचे काम पूर्ण होईल
कुंभ : नोकरी-व्यवसायात विशिष्ट महत्त्वाचे काम पूर्ण होईल. नोकरी-व्यवसायात योग्य व्यक्तींकडून योग्य सल्ला आणि मार्गदर्शन मिळेल. पूर्वी दिलेल्या नोकरीविषयक मुलाखती सफल झालेल्या अनुभवता येतील. चालू नोकरीत बदल हवा असल्यास त्यादृष्टीने प्रयत्न केल्यास सफलता मिळू शकते. आर्थिक स्थिती चांगली राहील. मात्र कामाचा ताण जाणवेल. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. संयम सोडू नका. स्वतःच्या रागावर नियंत्रण आवश्यक राहील. खर्चाचे प्रमाण वाढत चाललेले दिसेल. त्यामुळे अनावश्यक खर्चाला कात्री लावणे गरजेचे ठरेल. सहकुटुंब प्रवास घडू शकतात. मात्र प्रवासात काळजी घ्या. भावंडांशी वाद टाळा. |
|
लोकसंग्रहात वृद्धी
मीन : धार्मिक तसेच सामाजिक कार्यात रस निर्माण होईल. सामाजिक कार्यात सहकार्य द्याल. मानसन्मान वाढेल. लोकसंग्रहात वृद्धी होईल. नवीन ओळखी होतील. कार्य व्याप्ती वाढल्यामुळे काम जास्तीचे करावे लागेल. दैनंदिन कामकाजात व्यग्र राहावे. काही कामात अधिक परिश्रम घ्यावे लागण्याची शक्यता आहे. विशेषतः सरकारी स्वरूपाच्या कामांमध्ये जास्त वेळ द्यावा लागेल. काही प्रमाणात खर्च पण करावा लागेल. संयम ठेवल्यास कार्य पूर्ण करू शकाल. ध्येयापासून विचलित होणार नाही याची दक्षता घ्या. कौटुंबिक समस्या सुटतील. मात्र स्वतःच्या बोलण्यावर आणि वर्तणुकीवर नियंत्रण ठेवा. स्थावर मालमत्तेचे संबंधित असलेले वाद विवाद मिळतील. |