Thursday, July 18, 2024
Homeताज्या घडामोडीPandharpur News : पंढरपूरमध्ये तलावात बुडाल्याने तीन शाळकरी मुलांचा मृत्यू

Pandharpur News : पंढरपूरमध्ये तलावात बुडाल्याने तीन शाळकरी मुलांचा मृत्यू

दोन सख्ख्या भावांसह एका मित्राचा समावेश

सोलापूर : दोनच दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरात (Chhatrpati Sambhajinagar) खेळता खेळता तलावात बुडल्यामुळे तीन चिमुरड्यांना आपला जीव गमावावा लागल्याची घटना घडली होती. यामुळे संपूर्ण संभाजीनगर हळहळलं होतं. मात्र, या घटनेतून सावरत नाही तोच पंढरपुरातून (Pandharpur) अशीच आणखी एक घटना समोर आली आहे. पंढरपुरात शेततलावात बुडल्याने तीन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

पंढरपूर तालुक्यातील करकंब (Karakamb) येथील मोडनिंब रोडलगत असलेल्या परदेशी यांच्या शेततलावात पडून तीन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना काल शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली. मृतांमध्ये दोन सख्ख्या भावांसह एका मित्राचा समावेश आहे. मनोज अंकुश पवार (वय ११ वर्षे), गणेश नितीन मुरकुटे (वय ७ वर्षे), हर्षवर्धन नितीन मुरकुटे (वय ९ वर्षे) अशी बुडालेल्या मुलांची नावे आहेत.

पाण्याच्या टॅंकमध्ये तीन लहान मुले पडल्याची घटना करकंब परिसरात वाऱ्यासारखी पसरली. या घटनेची माहिती मिळताच करकंब पोलिसांनी तात्काळ सदर ठिकाणी धाव घेऊन या तलावातून या तीनही शाळकरी मुलांना बाहेर काढलं. नंतर त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. या दुर्दैवी घटनेमुळे करकंब परिसरात शोककळा पसरली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -