Thursday, March 20, 2025
Homeसाप्ताहिककोलाज‘स्वराज्य कनिका - जिजाऊ’त तेजस्विनी मुख्य भूमिकेत...

‘स्वराज्य कनिका – जिजाऊ’त तेजस्विनी मुख्य भूमिकेत…

ऐकलंत का!: दीपक परब

राष्ट्रमाता, राजमाता जिजाबाई शहाजीराजे भोसले… यांनी हिंदवी स्वराज्याची पायाभरणी करून हिंदवी स्वराज्य आणि छत्रपती शिवाजी महाराज दिले. बुद्धिमत्ता, चातुर्य, पराक्रम, शौर्य, दूरदृष्टी, कुशल राजनिती, कुटुंबवत्सल असे सगळेच गुण त्यांच्यात होते. शिवबाचे, शिवराय घडवताना या माऊलीने अनेक वादळं पेलली. पण या वादळात ही तेजस्वी ज्योत आणखी प्रखर झाली. प्रत्येक कसोटीच्या प्रसंगांना यशस्वी तोंड देऊन या माऊलीने स्त्रीशक्ती व मातृशक्तिचे चिरंतन उदाहरण सर्वांना दिले. जगाला दिशा देणाऱ्या या जगत्जननीच्या आयुष्यावर आधारित ‘स्वराज्य कनिका जिजाऊ’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

नुकतीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून या चित्रपटात जिजाऊंची भूमिका तेजस्विनी पंडित साकारणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर झळकले असून राजमाता जिजाऊ यांची करारी मुद्रा यात दिसत आहे. ६ फायरफ्लाईज प्रॉडक्शन्स निर्मित या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन अनुजा देशपांडे या करत आहेत.

जिजाऊसाहेबांच्या आयुष्यावरील वेगळ्या धाटणीचा हा चित्रपट आहे. जिजाऊसाहेबांचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व, त्यांच्या आयुष्यातील न उलगडलेले प्रसंग-घटना यात दिसणार आहेत. ही भूमिका करायला मिळणे ही निश्चितच आनंदाची बाब आहे. मात्र त्याहून जास्त जबाबदारी आहे, याची मला पूर्ण जाणीव आहे. ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म दिला, त्यांना घडवले ती माऊली स्वतः निश्चितच त्याच ताकदीची, पराक्रमी, अत्यंत कुशल राजनैतिक आणि मुख्य म्हणजे दूरदृष्टीची असणार यात कसलेच दुमत नाही. अशा या विलक्षण वीरमातेला पडद्यावर साकारणे हे माझे अहोभाग्यच आहे, असेही ती म्हणाली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -