Thursday, July 25, 2024
Homeताज्या घडामोडीलव्ह जिहाद : दलित मुलीला फूस लावून पळवून आणले, मुस्लिम मुलाविरोधात गुन्हा...

लव्ह जिहाद : दलित मुलीला फूस लावून पळवून आणले, मुस्लिम मुलाविरोधात गुन्हा दाखल

नगर : बिहार येथील अल्पवयीन दलित मुलीस फूस लावत मारून टाकण्याची आणि तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी नगर येथील एका मुस्लिम मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर प्रकरणा बाबत परिसरातील हिंदू समाजात मोठ्या प्रमाणात असंतोषाचे वातावरण पसरले आहे. नगर जिल्हयात वेळोवेळी होणाऱ्या अशा लव्ह जिहाद प्रकाराबाबत पोलीस प्रशासन कडक पावले उचलणार का ? असा प्रतिप्रश्न देखील या निमित्ताने विचारला जात आहे.

सदर लव्ह जिहाद धक्कादायक घटनेचा तपशील पुढीप्रमाणे, दलित समाजातील सोळा वर्षीय मुलगी रा. मोतिराजपुर सारन, सैदसाराय, राज्य बिहार हिने राहुरी पोलीस स्टेशनला हजर राहुन फिर्याद लिहून दिली आहे. ती अशी की, आम्ही सर्वजण मजुरी करुन उदरनिर्वाह करतो. आमच्या गावाजवळच भुहालपुर आवडा गाव असून, तेथील आफताबसाह बदसासाह शाई यास मी ओळखते. आमचे गाव मोतीराजपुर सारन व भुहालपुर आवडा यांचा बाजार धरमबागी बाजार मोतीराजपुर येथे असल्याने आम्ही सुमारे एक वर्षापासुन नेहमी बाजारात एकमेंकाना भेटत होतो. भेटीदरम्यान सुमारे तीन महिनेपूर्वी मला आफताबसाह बदसासाह शाई यांने आपण पळुन जावुन लग्न करु असे सांगितल्याने मी त्याला म्हणाले की, मी हिंदु आहे. तु मुस्लिम आहे. मी तुझ्या बरोबर लग्न करणार नाही. तुझ्या सोबत येणार नाही. असे म्हणाले असता त्याने तु माझ्यासोबत आली नाही तर मी तुला मारुन टाकीन. अशी धमकी दिली.

त्यावेळी मी घाबरले होते. त्याने मला बळजबरीने माझे गावातुन एक पिकअप गाडीत बसवुन छपरा येथे आणले. तेथुन रेल्वेने त्याची बहीण-फरिदा रोजादीन शाई व तिचा पती- रोजादिन शाई हे राहत असलेल्या ब्राम्हणी ता. राहुरी जि. अहमदनगर राज्य (महाराष्ट्र) येथे घेवून आला. आम्ही आलो त्या दिवसापासुन आम्ही दोघे आफताबची बहीण फरिदा हिच्याकडे राहत आहोत. दरम्यान आफताबसाह हा मला अधून मधून मला म्हणत असे की, तु येथे कोणाला काही सांगायाचे नाही. फोनवर सुद्धा काही बोलायचे नाही. मी फोनवर बोलल्याची रेकॉर्ड नंतर ऐकून तो मला मारहाण करत असे, तरोच त्याची बहीण फरिदा ही सुद्धा मला अधूनमधून मारहाण करीत असे. मला शिवीगाळ करीत असे. कोणाला काही सांगू नको असे म्हणत असे.

अफताब साह याने माझे सोबत वेळोवेळी बळजबरीने शारीरीक संबंध ठेवले होते, मी त्याला सांगायचे की, मी तुझ्यासोबत शारिरीक सबंध ठेवणार नाही त्यावेळी तो मला दमबाजी करुन मारहाण करून माझ्याशी बळजबरीने शारीरीक सबंध करत होता. तसेच आता सुमारे एक महिन्यापुर्वी आम्ही वेगळी खोलीत राहत होतो. एके दिवशी पाहुणा रोजाद्दीन घुईल शाई हा मी एकटी घरात असतांना माझे वेगळ्या राहत असलेल्या खोलीत येवून म्हणाला की, मी तुम्हाला राहायला दिले आता तु मला काय देणार असे म्हणुन मी नकार देत असतांना त्याने माझ्या सोबत बळजबरीनें शरीर संबंध केले. त्यानंतर अफताबसाह हा घरी नसतांना वेळोवेळी रोजादीन याने माझेशी बळजबरीने शारीरीक संबंध केले आहेत. मी त्यांना नाही म्हणाले तर मला मारहाण करत होते. त्यामुळे मी त्यांचे त्रासाला कंटाळुन माझे बहीण बबीतादेवी विनोद दास रा. महेशछपरा पोष्ट बाघाकोल ता. मकेळ जि. छपरा राज्य बिहार येथे मोबाईल फोन करुन कळविले की, मला अफताबसाह याने त्याचे बहीण फरिदा राहत असलेल्या गावी ब्राम्हणी ता राहुरी जि. अहमदनगर राज्य महाराष्ट्र येथे आणले आहे व ते मला खुप त्रास देत आहेत.

त्यावरुन बहीण बबीतादेवी व मेहुणे विनोद दास असे मी सांगितले प्रमाणे आज ब्राम्हणी ता. राहुरी जि. अहमदनगर राज्य महाराष्ट्र येथे आले त्यावेळी घरी अफताब व त्याची बहीण फरीदा आणि मी होती. त्यावेळी मी बहीण व मेहुणे यांना मला झालेल्या त्रासाबद्दल सांगितले मला बहीण व मेव्हणे परत घरी घेवुन जात असतांना अफताब व त्याची बहीण फरीदा यांनी मला घेवुन जावु नका म्हणुन मला व माझे बहीण मेव्हणे यांना दमबाजी केली. परंतु ब्राम्हणी गावातील गावकरी लोकांचे मदतीने आम्ही पोलीस स्टेशनला आलो. माझी राजद्दीन घुईल शाई याने मारहाण करुन माझेशी बळजबरीने वेळोवेळी शरीर संबंध केले. आणि फरीदा राजद्दीन शाई दोघे रा. ब्राम्हणी ता. राहुरी जि. अहमदनगर यांनी मारहाण, शिवीगाळ, दमबाजी केली म्हणुन मी त्यांचे विरुद्ध तकार दिली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -