Saturday, May 24, 2025

क्रीडामहत्वाची बातमी

IND vs AFG: यशस्वी जायसवाल, शिवम दुबेच्या वादळासमोर अफगाणिस्तानची शरणागती, भारताची मालिकेत विजयी आघाडी

IND vs AFG: यशस्वी जायसवाल, शिवम दुबेच्या वादळासमोर अफगाणिस्तानची शरणागती, भारताची मालिकेत विजयी आघाडी

इंदौर: भारतीय संघाने(indian team) इंदौर टी-२० सामन्यात अफगाणिस्तानला(india vs afganistan) हरवले. टीम इंडियाने ६ विकेट राखत या सामन्यात विजय मिळवला. भारताच्या समोर विजयासाठी १७३ धावांचे आव्हान होते. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने यशस्वी जायसवाल आणि शिवम दुबे यांच्या शानदार खेळीच्या जोरावर भारताने १५.४ षटकांत ४ विकेट गमावताना हे आव्हान पूर्ण केले. यासोबतच भारतीय संघाने तीन सामन्यांची टी-२० मालिका २-० अशी जिंकली.



यशस्वी जायसवाल आणि शिवम दुबेची वादळी खेळी


भारतासाठी यशस्वी जायसवालने सर्वाधिक ३४ बॉलमध्ये ६८ धावा केल्या. या युवा खेळाडूने आपल्या खेळीदरम्यान ५ चौकार आणि ६ षटकार ठोकले. शिवम दुबेने सर्वाधिक ३२ बॉलमध्ये ६३ धावा केल्या. त्याने आपल्या खेळी दरम्यान ५ चौकार आणि ४ षटकार ठोकले. विराट कोहलीने या सामन्यात १६ चेंडूत २९ धावांची खेळी केली. याशिवाय भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि विकेटकीपर फलंदाज जितेश शर्मा शून्यावर बाद झाला.


अफगाणिस्तानसाठी करीम जन्नत सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने भारताच्या दोन गोलंदाजांना बाद केले. याशिवाय फजुल्लाह फारूकी आणि नवीन उल हकला १-१ विकेट मिळवण्यात यश मिळाले.


भारताचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरलेल्या अफगाणिस्तानच्या संघाने २० षटकांत १७२ धावा केल्या. अफगाणिस्तानसाठी ऑलराऊंडर गुलबदीन नईबने सर्वाधिक ३५ बॉलमध्ये ५७ धावा केल्या. भारतासाठी अर्शदीप सिंह यशस्वी गोलंदाज ठरला. अर्शदीप सिंहे ४ ओव्हरमध्ये ३२ धावा देत ३ फलंदाजांना बळी ठरवले.

Comments
Add Comment