Thursday, June 12, 2025

IND vs AFG: विराट कोहलीचे पुनरागमन शक्य, मात्र कशी असणार प्लेईंग ११?

IND vs AFG: विराट कोहलीचे पुनरागमन शक्य, मात्र कशी असणार प्लेईंग ११?

मुंबई: आज भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात ३ सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा टी-२० सामना खेळवला जाणार आहे. दोन्ही संघ इंदौरच्या होळकर स्टेडियममध्ये आमनेसामने असतील. मात्र या सामन्यात टीम इंडियाचे प्लेईंग ११ काय असणार आहे? खरंत, भारतीय संघासाठी प्लेईंग ११ ची निवड सोपी असणार नाही. दुसऱ्या सामन्यात विराट कोहलीचे पुनरागमन निश्चित आहे. यशस्वी जायसवालच्या जागी शुभमन गिलला संधी मिळू शकते. मात्र रवी बिश्नोई आणि कुलदीप यादव यांच्यातील एकाची निवड सोपी नाही.



काय असणार टीम इंडियाची प्लेईंग ११?


असे ानले जात आहे की रोहित शर्मासोबत शुभमन गिल सलामीवीर असेल. यानंतर तिसऱ्या स्थानावर कोहली खेळेल. तर चौथ्या स्थानावर तिलक वर्मा दिसू शकतो. विकेटकीपर म्हणून संजू सॅमसनच्या वर जितेश शर्माला संधी मिळू शकते. पहिल्या सामन्यात शिवम दुबेला प्लेयर ऑफ दी मॅच निवडण्यात आले होते. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात त्याचे खेळणे निश्चित आहे.



भारतीय संघाचे संभाव्य प्लेईंग ११


रोहित शर्मा (कर्णधार)
शुभमन गिल
विराट कोहली
तिलक वर्मा
जितेश शर्मा (विकेटकीपर)
शिवम दुबे
रिंकू सिंह
अक्षर पटेल
रवि बिश्नोई/कुलदीप यादव
मुकेश कुमार
अर्शदीप सिंह

Comments
Add Comment