Tuesday, May 13, 2025

ताज्या घडामोडी

तणावापासून सुटका हवीये तर आजपासून खा हे फळ, होतील हे फायदे

तणावापासून सुटका हवीये तर आजपासून खा हे फळ, होतील हे फायदे

मुंबई: आजकालच्या धावपळीच्या युगात तणाव म्हणजेच स्ट्रेस ही एक सामान्य समस्या बनली आहे. काम, कुटुंब, वेळेची कमतरता आणि विविध प्रकार्या जबाबदाऱ्यांमुळे लोकांचा तणाव वाढत चालला आहे. आजकल तरूण पिढीला स्ट्रेस वाढत चालला आहे. कारण त्यांच्याकडे अनेक पर्याय आहेत. तसेच भविष्याकडून प्रचंड अपेक्षा आहेत. सोबतच नोकरी, नातेसंबधाचाही त्यांच्यावर दबाव असतो. मात्र तुम्हाला माहीत आहे का काही फळे तुम्ही रोजच्या डाएटमध्ये सामील कराल तर हा तणाव कमी करण्यास मदत होऊ शकते.


काही फळांमध्ये अँटी स्ट्रेस गुण असतात. यातील व्हिटामिन्स, मिनरल्स आणि अँटी ऑक्सिडंट तत्व स्ट्रेस हार्मोन कमी करण्यास मदत करतात. जाणून घेऊया या फळांबद्दल...



केळे


केळ्यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि व्हिटामिन बी६ सारखी पोषक तत्वे असतात जे स्ट्रेस हार्मोन कमी करण्यास मदत करतात. पोटॅशियम असे मिनरल आहे जे तणाव नियंत्रित करण्यास कमी करते. हे डोके शांत ठेवण्याचे काम करते. व्हिटामिन बी६, सेरोटोनिन नावाचे न्यूरोट्रान्समीटरचे उत्पादन वाढवण्याचे काम करते.



सफरचंद


सफरचंदामध्ये अँटीऑक्सिडंट्स, व्हिटामिन सी आणि फायबर असते जे तणाव कमी करण्यास मदत करते. दररोज एक सफरचंद खाल्ल्याने तणाव कमी होतो. सफरचंदामध्ये अनेक पोषकतत्वे असतात जे तणाव कमी करण्यास मदत करतात. सफरचंदामध्ये अँटी ऑक्सिडंट्स असतात यामुळे पेशींना नुकसान होण्यापासून मदत होते. सोबतच शरीराचा स्ट्रेसही कमी होतो. याशिवाय सफरचंदामध्ये व्हिटामिन सी आढळते. व्हिटामिन सीमुळे तणाव कमी होण्यास मदत होते. सफरचंद खाल्ल्याने तणाव जाणवत नाही.



डाळिंब


डाळिंब हे एक असे फळ आहे ज्यामुळे तणाव कमी होण्यास होते. डाळिंबामध्ये व्हिटामिन सी आणि अँटी ऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात. व्हिटामिन सी आपल्या शरीरातील पेशींचे आरोग्य चांगले राखतात आणि तणाव हा्र्मोन कमी करतात. अँटी ऑक्सिडंट फ्री रॅडिकल्शी लढतात .



नासपती


नासपतीमध्ये व्हिटामिन बी आढळते. हे व्हिटामिन आपल्या शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहे. यामुळे तणाव कमी होण्यास मदत होते. बी व्हिटामिनमुळे असे काही रसायन तयार होते ज्याचे नाव आहे सेरोटोनिन. सेरोटोनिन मेंदूमध्ये आढळणारे रसायन आहे. यामुळे मूड चांगला राहण्यास मदत होते.

Comments
Add Comment