
नवी दिल्ली: गोव्यामध्ये चार वर्षीय मुलाच्या हत्या प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. आरोपी सूचना सेठच्या बॅगमधून एक चिठ्ठी हाती आली आहे. यात लिहिले आहे की माझे माझ्या मुलावर खूप प्रेम आहे. ही चिठ्ठी टिश्यू पेपरवर आयलायनरच्या सहाय्याने लिहिण्यात आली होती. ज्या बॅगमध्ये तिने आपल्या मुलाचा मृतदेह लपवला होता त्याच बॅगमध्ये ही चिठ्ठी ठेवली होती. पोलिसांनी ही चिठ्ठी हस्तगत केली आहे. तसेच हा पुरावा म्हणून कोर्टात सादर केला जाणार आहे.
मुलाला वडिलांना भेटताना पाहू शकत नव्हती
पोलीस अधिकाऱ्यांच्या मते ही चिठ्ठी मुलाची हत्येच्या दिशेने इशारा करते. ही चिठ्ठी घाईघाईने आयलायनरने लिहिली होती. यात सूचना सेठने लिहिले की, कोर्ट आणि माझे पती माझ्यावर मुलाची कस्टडी देण्यासाठी दबाव टाकत आहे. मी हे आणखी सहन करू शकत नाही. माझे पती हिंसक आहेत. ते माझ्या मुलावर चुकीचे संस्कार करता. मी खूप निराश आहे. माझे माझ्या मुलावर प्रेम आहे मात्र त्याला त्याच्या वडिलांना भेटताना मी पाहू शकत नाही.
मुलाची हत्या केल्याचा गुन्हा कबूल नाही
पोलिसांच्या माहितीनुसार सूचना सेठने चिठ्ठी लिहिल्याचे कबूल केले आहे. मात्र ती या गोष्टीवर कायम आहे की तिने मुलाची हत्या केलेली नाही. हे हत्या प्रकरण सोडवण्यासाठी पोलिसांनी सूचना सेठला त्याच क्राईम लोकेशनवर नेले. तेथे तो सीन पुन्हा रिक्रिएट कऱण्याचा प्रयत्न केला. ज्या कटरने सूचनाने आपली नस कापण्याचा प्रयत्न केला होता तेथून तो कटर हाती घेण्यात आला.