Sunday, July 21, 2024
HomeदेशRam Mandir Inauguration : श्रीरामाच्या मंदिरासाठी नियतीने आधीच पंतप्रधान मोदींना निवडलं होतं!

Ram Mandir Inauguration : श्रीरामाच्या मंदिरासाठी नियतीने आधीच पंतप्रधान मोदींना निवडलं होतं!

लालकृष्ण अडवाणींना आपल्या विशेष लेखात दिला आठवणींना उजाळा…

मुंबई : अयोध्येत २२ जानेवारीला होणार्‍या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना (Ram Mandir Pran Pratistha) सोहळ्यासाठी सर्व भारतवासी आतुरले आहेत. जे इतक्या वर्षांत कोणाला जमलं नाही, ते पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) करुन दाखवलं. त्यामुळे जगभरात मोदींचं कौतुक होत आहे. त्यातच माजी उपपंतप्रधान आणि भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी (Lal Krishna Advani) यांनीही या सोहळ्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. भगवान प्रभू श्रीरामचंद्राचं भव्य मंदिर (Ayodhya Ram Mandir) तयार करण्यासाठी नियतीने आधीच पंतप्रधान नरेंद्र मोदींची निवड केली होती, असं अडवाणी म्हणाले आहेत.

लालकृष्ण अडवाणी यांनी राष्ट्र धर्म पत्रिकाच्या पुढील विशेष अंकासाठी विशेष लेख लिहिला आहे. लालकृष्ण अडवाणी यांनी जी रथ यात्रा काढली, त्याला ३३ वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्यांनी आपल्या लेखातून आठवणींना उजाळा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या रथयात्रेत लालकृष्ण आडवाणी यांच्यासोबत होते. त्यावेळी नरेंद्र मोदी जास्त प्रसिद्ध नव्हते. पण त्याचवेळी नियतीने त्यांना भगवान प्रभूरामाचं भव्य मंदिर उभारण्यासाठी निवडलं होतं, असं अडवाणी यांनी आपल्या लेखात म्हटलं आहे.

लालकृष्ण अडवाणी यांनी आपल्या लेखात म्हटलं आहे की, ज्यावेळी रथ यात्रेला सुरुवात केली तेव्हा त्याला इतकं मोठं स्वरुप येईल असे येईल, त्याचं आंदोलनात रुपांतर होईल, असं वाटलं नव्हतं. पण त्याचवेळी भगवान प्रभू श्रीरामाने आपल्या भव्य मंदिर निर्मितीसाठी आपल्या भक्ताला (नरेंद्र मोदी) निवडलं होतं. नियतीने तेव्हाच ठरवलं होतं, अयोध्यामध्ये भगवान प्रभू श्रीरामाचं मंदिर होणार, त्यासाठी नरेंद्र मोदी यांना निवडलं होतं.

वाजपेयींची कमी जाणवते…

राम मंदिर आंदोलन राजकीय प्रवासाथील सर्वात निर्णायक आणि परिवर्तनकारी असल्याचं लालकृष्ण अडवाणी आपल्या लेखात म्हणाले आहेत. इतकेच नाही तर लालकृष्ण आडवणी यांनी आपल्या लेखात माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यासोबतच्या राजकीय प्रवासाचाही उल्लेख केलाय. राम मंदिरच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाआधी अटल बिहारी वाजपेयी यांची कमी जाणवत असल्याचे आडवणी यांनी सांगितलेय.

पंतप्रधान देशातील प्रत्येक नागरिकाचं प्रतिनिधित्व करतील

राम मंदिराचे स्वप्न साकार करून अयोध्येत रामलल्लाचे भव्य मंदिर उभारण्याचा संकल्प पूर्ण केल्याबद्दल अडवाणी यांनी आपल्या लेखात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. २२ जानेवारी रोजी पंतप्रधान राम लल्लाची प्राणप्रतिष्ठा करतील, तेव्हा ते देशातील प्रत्येक नागरिकाचं प्रतिनिधित्व करतील, असंही अडवाणी यांनी आपल्या लेखात म्हटलं आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -