
मुंबई: ठाणे जिल्ह्याच्या डोंबिवली परिसरातून मोठी बातमी समोर येत आहे. डोंबिवलीमधील लोधा फेज २ खोना एस्ट्रेला टॉवरमध्ये भीषण आग लागली आहे. या आगीत इमारतीचे पाच ते सहा मजल्यांच्या गॅलरी जळून खाक झाल्या. आग लागल्यानंतर तेथे अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे कार्य वेगात सुरू आहे.
शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागल्याचे सांगितले जात आहे. मात्र अद्याप ठोस कारण स्पष्ट झालेले नाही. विशेष म्हणजे या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यापर्यंतच लोक राहत होते. आग लागल्यानंतर तातडीने सर्व नागरिकांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले.
#WATCH | Maharashtra: A massive fire broke out in a building at Khoni Palava near Dombivli. Four fire tenders are present at the spot. No casualty reported yet.
(Video Source: Thane Municipal Corporation) pic.twitter.com/jxUmZbeUp3
— ANI (@ANI) January 13, 2024
शॉट सर्किटने लागली आग
मिळालेल्या माहितीनुसार, ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागती. आग इतकी भीषण होती की ती वेगाने वरच्या मजल्यांपर्यंत पोहोचली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर आला आहे. यात तुम्ही पाहू शकता की आगीचे लोळ इमारतीत दिसत आहे. दरम्यान, अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहोचली.