Mumbai Terror Attack : मुंबईतील २६/११ च्या हल्ल्याचं प्रशिक्षण देणारा दहशतवादी हाफिज भुट्टावीचा मृत्यू

गतवर्षी मे महिन्यातच झाला होता मृत्यू; परंतु...


मुंबई : मुंबईतील २६/११ चा दहशतवादी हल्ला (Mumbai 26/11 Terror Attack) म्हटला की अजूनही तो हल्ला अनुभवलेल्या लोकांच्या अंगावर काटे उभे राहतात. या हल्ल्यात सहभाग असलेल्या अनेक दहशतवाद्यांना पकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. यात सर्वांच्या लक्षात राहिलेल्या अजमल कसाबला (Ajmal Kasab) तर पुण्याच्या येरवडा कारागृहात फाशीची शिक्षा देण्यात आली होती. हा भयंकर हल्ला घडवून आणणार्‍या आणि कुख्यात अजमल कसाब तसेच आणि इतर दहशतवाद्यांना प्रशिक्षित करणार्‍या दहशतवादी हाफिज अब्दुल सलाम भुट्टावी (Hafiz Abdul Salam Bhuttavi) याचा मृत्यू झाला आहे. मुंबई २६/११ दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हाफिज सईद याचा भुट्टावी हा निकटवर्तीय होता.


विशेष म्हणजे, २९ मे २०२३ रोजी दहशतवादी हाफिज अब्दुल सलाम भुट्टावीचा मृत्यू झाला, परंतु संयुक्त राष्ट्रांनी (UN) आता अधिकृतपणे आपल्या वेबसाइटवर याची पुष्टी केली आहे. पंजाब प्रांतात पाकिस्तान सरकारच्या ताब्यात असताना त्याचा मृत्यू झाल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे.


मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदचा हा भुट्टावी इतक्या जवळचा होता की, सईदला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर दहशतवादी संघटनेच्या दैनंदिन कारवाया आणि संघटनेच्या वतीने निर्णय घेण्याचं काम भुट्टावी करत होता. भुट्टावीने किमान दोन वेळा लष्कर-ए-तैयबा/जमात-उद-दावा (LeT/JuD) चा प्रमुख म्हणून काम केले. JuD ही लष्कर-ए-तैयबाची प्रमुख दहशतवादी संघटना आहे. भुट्टावीने पाकिस्तानातील मुरीदके येथे लष्कराचे मुख्यालयही स्थापन केले होते.


भुट्टावीच्या मृत्यूनंतर, जमातशी संबंधित एका व्यक्तीने सांगितले होते की, ७७ वर्षीय भुट्टावी दहशतवादी वित्तपुरवठा प्रकरणात ऑक्टोबर २०१९ पासून लाहोरपासून सुमारे ६० किलोमीटर अंतरावर असलेल्या शेखूपुरा जिल्हा कारागृहात कैद होता. २९ मे रोजी छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्याने भुट्टावीला रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात पोहोचल्यानंतर त्याला मृत घोषित करण्यात आले.


युनायटेड नेशन्सने त्यांच्या वेबसाइटवर म्हटले की, भुट्टावीने नोव्हेंबर २००८ मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यासाठी दहशतवादी तयार करण्यात मदत केली. मुंबई हल्ल्यात १५० हून अधिक लोक मारले गेले आणि अनेक जण जखमी झाले. LeT/JuD च्या मदरसा नेटवर्कसाठी भुट्टावी जबाबदार असल्याचे मानले जाते. त्याच वेळी, २००२ च्या मध्यात, भुट्टावी पाकिस्तानातील लाहोरमध्ये लष्कर-ए-तैयबा या संघटनेची स्थापना करण्याचाही प्रभारी होता.

Comments
Add Comment

तिरुपती लाडू वाद पुन्हा पेटला, लाडूवात बाथरूम साफ करायचे केमिकल...... ; मुख्यमंत्री नायडूंचे गंभीर आरोप

तिरुपती : तिरुपती बालाजी मंदिरातील लाडू प्रसादाच्या शुद्धतेवरून सुरू असलेला वाद पुन्हा एकदा चर्चेच्या

इराणने पुन्हा एकदा जगाची झोप उडवली, इराणच्या क्षेपणास्त्राची धक्कादायक रेंज, जाणून घ्या

दिल्ली: अमेरिका आणि इराण या दोन देशांमधील तणावाने जगाचं टेन्शन वाढलं आहे. कोणत्याही क्षणी अमेरिका इराणवर हल्ला

Sikkim Earthquake: सिक्कीममध्ये जाणवले चक्क १३ भूकंपाचे धक्के

सिक्कीम: सिक्कीमच्या काही भागात चक्क १३ भूकंपाचे धक्के जाणवले. गुरुवारी रात्री उशिरा ते शुक्रवार सकाळपर्यंत हे

Bharat Taxi App: भारतीय टॅक्सी चालक ओला किंवा उबरपेक्षा किती जास्त कमावू शकतात?, जाणून घ्या...

मुंबई: जर तुम्ही ओला किंवा उबरने दररोज प्रवास करत असाल किंवा टॅक्सी चालवून उदरनिर्वाह करत असाल, तर ही बातमी

Maharashtra's Rajya Sabha Seats : महाराष्ट्रातील ७ राज्यसभा जागांची निवडणूक 'बिनविरोध' होणार? शरद पवारांच्या जागेवरही टांगती तलवार

मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत विजयाचा फायदा आता महायुतीला राज्यसभेतही मिळणार

चेन्नईमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव, H5N1 विषाणूमुळे शेकडो कावळे मृत्युमुखी; सरकारकडून महत्त्वाच्या सूचना जारी

चेन्नई: तामिळनाडूची राजधानी चेन्नईत बर्ड फ्लूचा इशारा देण्यात आला आहे. चेन्नईमध्ये शेकडो कावळे मृत आढळले आहेत.