मुंबई: रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ आजपासून अफगाणिस्तानविरुद्ध ३ सामन्यांची टी-२० मालिका खेळत आहे. या मालिकेचा आजपासून सुरूवात झाली आहे. मोहालीमध्ये आजचा पहिला सामना रंगत आहे. यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
या टॉसदरम्यान रोहितसोबत एक मजेदार किस्सा पाहायला मिळाला. रोहित आपल्या खेळाडूचे नावच विसरला जो सामन्यात खेळणार नाही.
Typical Rohit Sharma moment during the toss😂#RohitSharma𓃵 #INDvsAFG pic.twitter.com/ntWUjdWF4t
— Quantum⁴⁵ Yadav (@45Quantum) January 11, 2024
अँकरने जेव्हा रोहितला विचारले की कोणता खेळाडू सामन्याच्या बाहेर आहे. यावर रोहितने आवेश खान, संजू सॅमसन आणि यशस्वी जायसवाल यांची नावे घेतली. मात्र रोहित आणखी एका खेळाडूचे नाव विसरला.
तेव्हा रोहितने अँकरला सांगितले की त्याने टॉस आधी त्याला सांगितले होते ना. तेव्हा अँकर मुरली कार्तिकने स्पिनर कुलदीप यादवचे नाव घेतले. तेव्हा रोहित एकदम खुश झाला आणि त्याने अँकरच्या हो ला हो म्हटले.
रोहितचा हा मजेदार किस्सा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. रोहित तब्बल १४ महिन्यांनी टी-२० क्रिकेटमध्ये परतत आहे. या सामन्यात विराट कोहली खेळत नाहीये.