Thursday, July 18, 2024
Homeमहाराष्ट्रSatyajit Tambe : लोकशाहीचा महाकुंभ यशस्वी करण्यासाठी युवकांची भूमिका महत्वाची : सत्यजीत...

Satyajit Tambe : लोकशाहीचा महाकुंभ यशस्वी करण्यासाठी युवकांची भूमिका महत्वाची : सत्यजीत तांबे

पुणे येथे आदर्श युवा आमदार पुरस्काराने आमदार सत्यजीत तांबे सन्मानित

संगमनेर : लोकशाहीचा महाकुंभ मेळा हा २०२४ या वर्षात भरणार आहे. १२७ पैकी ६४ देशात निवडणूक होणार आहेत. जगात लोकशाहीचा उत्सव साजरा केला जाणार आहे. लोकशाहीच्या उत्सवात युवकांचा सहभाग हा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. युवकांचा सहभाग हा निवडणूक लढण्यापुरता मर्यादित नसून आपण राजकीयदृष्ट्या गंभीर कसे होऊ शकतो, याकडेही लक्ष दिले पाहिजे. राजकारणात युवकांनी सतर्क राहिले पाहिजे, असे प्रतिपादन नाशिक पदवीधरचे आमदार सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांनी केले.

१३ वी भारतीय छात्र संसद गव्हर्निंग कौन्सिल आयोजित ‘आदर्श युवा आमदार सन्मान – २०२४’ कार्यक्रम बुधवारी पार पडला. पुणे येथील कोथरूड मधील एमआयटी-डब्ल्यूपीयुच्या स्वामी विवेकानंद सभा मंडपात कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी आमदार सत्यजीत तांबें यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी आमदार तांबे बोलत होते.

यावेळी सत्यजीत तांबे यांनी आपल्या मनोगतात म्हंटले की, आज मला खूप आनंद होतोय, एमआयटीमध्ये मला आदर्श युवा विधायक सन्मान – २०२४ चा पुरस्कार दिला जात आहे. याच एमआयटीने विद्यार्थी राजकारणामध्ये प्रवेश दिला होता. एमआयटी ही एक व्हायब्रंट संघटना आहे. इथूनच माझ्या विद्यार्थी राजकारणाला सुरुवात झाली. एनएसयुआय, युथ काँग्रेस ते आमदार पदापर्यंत पोहोचलो. एमआयटी हे माझं कुटुंब आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -