मोहाली: शिवम दुबेच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर भारताने अफगाणिस्तानवर(India vs afganistan) पहिल्या सामन्यात विजय मिळवला आहे. या विजयासह भारताने ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
भारताने अफगाणिस्तानविरुद्ध पहिल्या टी-२० सामन्यात ६ विकेट राखत तसेच १५ बॉल राखत विजय मिळवला. अफगाणिस्तानने पहिल्यांदा फलंदाजी करताना ५ बाद १५८ धावा केल्या होत्या. भारताने विजयासाठीचे १५९ धावांचे आव्हान १५ बॉल राखत पूर्ण केले.
भारताच्या विजयात शिवम दुबे चमकला. शिवम दुबेने ४० बॉलमध्ये ५ चौकार आणि २ षटकारांच्या जोरावर ६० धावांची खेळी केली. तब्बल १४ महिन्यांनी टी-२०मध्ये खेळणारा भारताचा कर्णधार रोहित शर्माला या सामन्यात भोपळाही फोडता आला नाही. तो रनआऊट झाला.
शुभमन गिलला २३ धावा करता आल्या. तर तिलक वर्माने २६ धावा केल्या. जितेश शर्माने ३१ धावांची खेळी केली.तर रिंकू सिंह १६ धावांवर नाबाद राहिला.
तत्पूर्वी, अफगाणिस्तानने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकांत १५८ धावा केल्या होत्या. सलामीवीर रहमनुल्लाह गुरबाजने २३ धावांची खेळी केली. इब्राहिम झादरानने २५ धावा केल्या. अझमतुल्लाह ओमरझाईने २९ धावा केल्या. मोहम्मद नबीने ४२ धावा केल्या.