मुंबई: काही लोक तुम्ही पाहिले असतील की ते नेहमीच थकलेले असतात. असे लोक अनेकदा सततचा थकवा तसेच झोपेची वारंवार तक्रार करत असतात. तुमच्यासोबतही असेच होते. तुम्हीही सतत थकलेले आणि झोपेलेल असता का? याचे उत्तर जर हो असेल तर तुम्हाला तुमच्या डाएटमध्ये खास बदल करावा लागेल. आरोग्य तज्ञांच्या मते आजच्या काळात डाएटमध्ये अशा काही गोष्टी आहेत ज्या तुमच्या मानसिक आणि शारिरीक आरोग्यावर परिणाम करत आहेत. सततचा थकवा आणि झोपेपासून बचावासाठी काही गोष्टी डाएटमधून काढून टाकण्याची गरज आहे.
थकवा दूर करण्यासाठी खाऊ नका या गोष्टी
हाय शुगर फूड शरीरावर मोठा परिणाम करतात. याला डाएटमध्ये सामील केल्याने तुम्हाला इन्स्टंट एनर्जी मिळते मात्र ती एनर्जी लवकर संपते. ही साखर तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम करण्यास सुरूवात करते. अशातच डाएटमध्ये हाय शुगरवाले पदार्थ खाऊ नका.
रिफाईंड ब्रेड आणि धान्य यामुळे तुम्हाला सतत थकवा जाणवू शकतो. सफेद तांदूळ, सफेद ब्रेड, पास्ता यात फायबर कमी प्रमाणात असते. हे पचवण्यासाठी शरीराला अधिक मेहनत करावी लागते. यामुळे शरीरात थकवा निर्माण होतो.
हाय फॅट फूड शरीरावर दीर्घकाळ वाईट परिणाम करतात. दरम्यान, पाहिले असता काही फॅट शरीरासाठी गरजेचे आहेत तर मात्र याच्या अतिरिक्त सेवनाने झोप आणि थकवा निर्माण होतो. तसेच हाय फॅट फूड पचवण्यासाठी शरीराला अधिक मेहनत करावी लागते.
फास्ट फूड आणि प्रोसेस्ड फूड सध्या मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात. मात्र यामुळे शरीरास मोठे नुकसान पोहोचते. या पद्धतीच्या पदार्थामध्ये अनहेल्दी फॅटसोबत रिफाईंड कार्बोहायड्रेट आणि साखर मोठ्या प्रमाणात असते. हे सर्व पदार्थ खाल्ल्याने साखरेची पातळी वाढते. तसेच शरीरातील एनर्जी कमी होते.
आयर्नची कमतरता असलेले पदार्थही शरीराला नुकसान देतात. आरोग्य तज्ञांच्या मते आर्यन शरीराच्या सर्व भागांना ऑक्सिजन सप्लाय करण्याचे काम करते. अशातच तुम्ही असे पदार्थ खाल ज्यात आयर्न नाही यामुळे शरीर अॅनिमियाची शिकार होऊ शकते.