Eknath Shinde : २०१९ मध्ये जनतेसोबत बेईमानी केलेल्यांना मोठी चपराक मिळाली!

आमदार अपात्रतेच्या निकालावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य


मुंबई : अनेक महिने प्रतिक्षेत असलेल्या शिवसेना आमदार अपात्रतेच्या (Shivsena MLA Disqualification) निकालात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचंच पारडं जड ठरलं. शिंदेंचीच शिवसेना खरी असल्याचा निकाल देत दोन्ही बाजूंकडच्या आमदारांना अपात्र न करण्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी घेतला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी रात्री संवाद साधला व विरोधकांवर हल्लाबोल चढवला. 'हुकुमशाहीने पक्ष चालवणाऱ्यांना या निर्णयामुळे मोठा झटका बसला', असे म्हणत एकनाथ शिंदेंनी ठाकरेंवर निशाणा साधला.


एकनाथ शिंदे म्हणाले, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेला निर्णय म्हणजे सत्याचा आणि लोकशाहीचा विजय आहे. सत्तेत आल्यापासून कायम एकनाथ शिंदेंचे मुख्यमंत्रीपद जाणार असे सारखे काहीजण बोलत होते. परंतु अजूनही मी सत्तेत कायम आहे. हुकुमशाहीने पक्ष चालवणाऱ्यांना या निर्णयामुळे मोठा झटका मिळाला आहे. हा लोकशाहीचा विजय आहे. महाराष्ट्रातील तमाम जनतेचा विजय आहे. आजचा जो निर्णय झालेला आहे तो प्रत्येक ठिकाणी एक माइल स्टोन ठरणार आहे. हा निर्णय जनतेच्या दृष्टीने खूप योग्य आहे.


आमदार अपात्रचा प्रकरणावरून विरोधकांनी केलेल्या टीकेवर एकनाथ शिंदे म्हणाले, विरोधक कोणालाच मानत नाहीत. निवडणूक आयोग, न्यायालयाला देखील मानत नाहीत. ते सर्व संस्थांपेक्षा नेहमी स्वतःला मोठे मानतात. सुप्रीम कोर्टाला देखील अनेक सल्ले देण्याचं त्यांनी काम केलं म्हणून त्यांना आज मोठी चपराक मिळाली आहे. २०१९ मध्ये ज्यांनी जनतेसोबत बेईमानी केली त्यांना हा मोठा चपराक आहे, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली.



आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये ४५ हून अधिक जागा आमच्याच


२०१९ साली बाळासाहेबांचे विचार विकले आणि सत्तेसाठी केले. बाळासाहेबांनी काँग्रेसला कधी जवळ गेले नाही. सत्तेसाठी यांनी काँग्रेसला जवळ केले आणि सरकार स्थापन केले. बाळासाहेबांच्या विचाराचा वारसा चालवणाऱ्या खऱ्या शिवसेनाला आज न्याय मिळाला आहे. प्रभू श्रीरामाने २२ जानेवारीच्या अगोदर आशीर्वाद दिला आहे. प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या आधी निर्णय आल्याने सर्व जनतेला न्याय मिळाला आहे. आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये ४५ हून अधिक जागा आम्ही जिंकून येणार आहोत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Comments
Add Comment

महाराष्ट्र मोटार वाहन कर (सुधारणा) विधेयक २०२६ एकमताने मंजूर

मुंबई : राज्यातील पर्यावरण संरक्षण, आर्थिक शिस्त आणि औद्योगिक विकास यांचा समतोल साधण्याच्या दृष्टीने

‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ कॉफीटेबल बुकचे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई : ‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ कॉफीटेबल बुकचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वर्षा

नक्षलग्रस्त भागात सागवान तस्करांचा धुमाकूळ; वनमंत्र्यांकडून सखोल चौकशीचे आदेश

मुंबई : नक्षलग्रस्त भागातील मौल्यवान सागवान लाकडाची तस्करी करणार्‍या संघटित टोळ्यांना राजकीय पाठबळ मिळत आहे,

मालाडमध्ये प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसनात घोटाळा- चौकशी समिती गठीत; अहवाल प्राप्त होईपर्यंत प्रकल्पाला स्थगिती

मुंबई : मालाड पूर्वमधील प्रकल्प बाधितांच्या (पीएपी) पुनर्वसनात घोटाळा झाल्याची बाब बुधवारी विधानसभेत चर्चेला

मुंबईतील जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापनात त्रुटी ठेवणार नाही; मंत्री पंकजा मुंडेंनी विधान परिषदेत मांडली ठोस भूमिका

मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या केईएम (KEM), नायर आणि कूपर या प्रमुख रुग्णालयांमधील जैववैद्यकीय कचऱ्याची

शिर्डी अ‍ॅसिड हल्ल्याचे विधिमंडळात तीव्र पडसाद - आरोपीला कठोरातील कठोर शासन करणार; पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची ग्वाही

मुंबई : शिर्डी जवळील लोणी येथे १३ वर्षीय शालेय विद्यार्थिनीवर झालेल्या अ‍ॅसिड हल्ल्याच्या घटनेने राज्य हादरले