Digha Railway Station : 'दिघा' रेल्वे स्थानकाचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन

अनेक महिन्यांपासून होतं प्रलंबित


ठाणे : ठाणे ते वाशी (Thane to Vashi) या ट्रान्स हार्बर मार्गिकेदरम्यान (Trans harbour line) 'दिघा' हे नवं रेल्वे स्थानक (Digha Railway Station) उभारण्यात आलं होतं. मात्र, नऊ महिन्यांपासून या रेल्वे स्थानकाचं उद्घाटन प्रलंबित होतं. अखेर हे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते होणार आहे, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. तसेच उरण रेल्व मार्गिकेचे उद्घाटन देखील पंतप्रधान मोदींच्या हस्तेच केले जाणार आहे.


दिघा रेल्वे स्थानकासाठी ४२८ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. या स्थानकाचं बांधकाम नऊ महिन्यांपूर्वीच पूर्ण झालं होतं. मात्र, अजूनही या स्थानकावर ट्रेन थांबत नव्हती. दिघा परिसरात मोठी लोकवस्ती आहे. तिथे आयटी कंपन्याही आल्या आहेत. तसेच, अनेक लोक दिघा एमआयडीसी परिसरात कामासाठी येतात. मात्र, त्यांना जवळचे असे स्थानक नव्हते. त्यामुळे रहिवाशी आणि नोकरदारांना ठाण्याला येण्यासाठी रिक्षा किंवा बसचा वापर करावा लागत होता. तसेच दिघा एमआयडीसीमध्ये येणाऱ्या कामगार वर्गाला ऐरोली स्थानकात उतरावे लागत होते.


या सगळ्याचा विचार करुन दिघा रेल्वे स्थानक बांधण्यात आले, मात्र त्याच्या उद्घाटनाला अनेक महिने मुहूर्त मिळत नव्हता. अखेर आता उद्घाटन ठरले असून ते पंतप्रधान मोदींच्या हस्ते आजच होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

अतिवृष्टीचा फटका बसलेल्या मत्स्यव्यावसायिकांना आधार देणार

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात मागील काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीसह मत्स्यव्यवसायालाही

मुंबई-अमरावती विमान पुन्हा रद्द, एअरलाइनने दिला ऑपरेशनल समस्येचा हवाला

अमरावती : अलायन्स मुंबईवरून आणि मुंबईला जाणाऱ्या विमानाचे एअरच्या येणाऱ्या उड्डाण शुक्रवारी (ता. तीन) रद्द

नगराध्यक्ष पदांचे आरक्षण सोमवारी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर राज्यातील २४७ नगर परिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका

गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ? पोलिसांची बजावली नोटीस

पुणे: महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारला पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या

सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसीतील कंपनीला मोठी आग

सोलापूर : चिंचोली एमआयडीसीतील तुळजाई केमिकल्स कंपनीला शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी आग लागली. आग