Saturday, July 6, 2024
Homeताज्या घडामोडीDigha Railway Station : 'दिघा' रेल्वे स्थानकाचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन

Digha Railway Station : ‘दिघा’ रेल्वे स्थानकाचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन

अनेक महिन्यांपासून होतं प्रलंबित

ठाणे : ठाणे ते वाशी (Thane to Vashi) या ट्रान्स हार्बर मार्गिकेदरम्यान (Trans harbour line) ‘दिघा’ हे नवं रेल्वे स्थानक (Digha Railway Station) उभारण्यात आलं होतं. मात्र, नऊ महिन्यांपासून या रेल्वे स्थानकाचं उद्घाटन प्रलंबित होतं. अखेर हे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते होणार आहे, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. तसेच उरण रेल्व मार्गिकेचे उद्घाटन देखील पंतप्रधान मोदींच्या हस्तेच केले जाणार आहे.

दिघा रेल्वे स्थानकासाठी ४२८ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. या स्थानकाचं बांधकाम नऊ महिन्यांपूर्वीच पूर्ण झालं होतं. मात्र, अजूनही या स्थानकावर ट्रेन थांबत नव्हती. दिघा परिसरात मोठी लोकवस्ती आहे. तिथे आयटी कंपन्याही आल्या आहेत. तसेच, अनेक लोक दिघा एमआयडीसी परिसरात कामासाठी येतात. मात्र, त्यांना जवळचे असे स्थानक नव्हते. त्यामुळे रहिवाशी आणि नोकरदारांना ठाण्याला येण्यासाठी रिक्षा किंवा बसचा वापर करावा लागत होता. तसेच दिघा एमआयडीसीमध्ये येणाऱ्या कामगार वर्गाला ऐरोली स्थानकात उतरावे लागत होते.

या सगळ्याचा विचार करुन दिघा रेल्वे स्थानक बांधण्यात आले, मात्र त्याच्या उद्घाटनाला अनेक महिने मुहूर्त मिळत नव्हता. अखेर आता उद्घाटन ठरले असून ते पंतप्रधान मोदींच्या हस्ते आजच होण्याची शक्यता आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -