
दिल्ली : दिल्ली एनसीआरमध्ये भूकंपाचे (Earthquake) धक्के जाणवले. नोयडा, गुरूग्राम भागात देखील धक्के जाणवले. या भूकंपाचा भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानातील फैजाबाद येथे होता. अफगाणिस्तानातील सीमा भागात मोठे धक्के जाणवले. हिंदुकुश भागात भूकंपाची तीव्रता ६.२ रजिस्टर स्केल एवढी आहे.
पंजाबसह चंदीगड आणि जम्मू-काश्मीरमध्ये देखील भूकंपामुळे पुन्हा एकदा जमीन हादरली. भूकंपाचे हे धक्के बराच वेळ जाणवत होते. जम्मू-काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यातील पीर पांचाळ परिसरात दक्षिणेलाही भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे हे धक्के केवळ भारतातच नव्हे तर शेजारील देश पाकिस्तानमध्येही जाणवले. भूकंपाचे धक्के जाणवताच लोक घरातून बाहेर आले. सध्या कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.
दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचा इशारा तज्ज्ञांनी आधीच दिला आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये कधीही मोठा भूकंप होऊ शकतो. मात्र, ते कधी येणार हे अद्याप निश्चित झालेले नाही.