
मुंबई: जर तुम्ही टॅक्स बचतीसह चांगले रिटर्न देणाऱ्या पर्यायाच्या शोधात आहात तर तुमच्यासाठी पीपीएफ हा एक चांगला आणि फायदेशीर मार्ग आहे.
Public Provident Fund म्हणजेच पीपीएफ : नव्या वर्षाच्या सुरूवातीसह आर्थिक वर्ष २०२३-२४च्या शेवटच्या टप्प्यात आहे. अशातच तुम्हाला टॅक्स सेव्हिंगसाठी गुंतवणुकीची शेवटची संधी आहे.
जर तुम्ही स्मार्ट पद्धतीने प्लानिंग कराल तर अनेक प्रकारच्या योजनांमध्ये तुम्ही गुंतवणूक करून लाखो रूपयांची बचत करू शकता. अशातच आम्ही तुम्हाला अशा पर्यायबद्दल सांगत आहोत जो तुम्हाला चांगले रिटर्नसह टॅक्स सेव्हिंगही करू शकता. याचे नाव आहे पब्लिक प्रोव्हिडंट फंड
पब्लिक प्रोव्हिडंट फंड म्हणजेच पीपीएफमध्ये तुम्ही गुंतवणूक करून गॅरंटेड रिटर्न मिळवू शकता. सोबतच टॅक्समध्येही सूट मिळवू शकता.
पीपीएफमध्ये तुम्ही १५ वर्षांसाठी पैसे गुंतवू शकता. गुंतवणूकदारांना दरवर्षी ५०० रूपयांपासून ते १.५० लाख रूपयांपर्यंत पैसे जमा करण्याची संधी मिळते. या रकमेवर ७.१ टक्के व्याज मिळते.
यासोबतच पीपीएफमध्ये तुम्हाला गुंतवणुकीवर इनकम टॅक्सच्या कलम ८० सी अंतर्गत १.५० लाख रूपये दरवर्षी सूट मिळते.
पीपीएफ कॅलक्युलेटरनुसार जर तुम्ही दरवर्षी १.५० लाख रूपयांपर्यंतची रक्कम १५ वर्षांसाठी गुंतवता तर तुम्हाला मॅच्युरिटीवर ४०.६८ लाख रूपये मिळतील. यात २२.५० लाख गुंतवणुकीची रक्कम असेल त्यावर १८.१८ लाख व्याज म्हणून मिळतील.