Wednesday, October 29, 2025
Happy Diwali

India Test Rankings: विराट कोहलीने कसोटी रँकिंगमध्ये घेतली मोठी उडी, रोहित शर्मा टॉप १०मध्ये

India Test Rankings: विराट कोहलीने कसोटी रँकिंगमध्ये घेतली मोठी उडी, रोहित शर्मा टॉप १०मध्ये

मुंबई: टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात हरवले होते. भारताच्या या विजयामुळे दोन सामन्यांची मालिका बरोबरीत सुटली. आत आयसीसीने कसोटीची ताजी रँकिंग जाहीर केली आहे. यात रोहित शर्मा आणि विराट कोहलीला खूप फायदा झाला आहे. रोहितने टॉप १०मध्ये स्थान मिळवले आहे तर कोहलीनेही मोठी उडी घेतली आहे. कसोटीत फलंदाजांच्या रँकिंगमध्ये टॉप १०मध्ये आता २ भारतीय फलंदाज झाले आहेत.

टीम इंडियाचा कर्णधार रोहितला कसोटी रँकिगमध्ये चार स्थानांनी फायदा झाला आहे. तो १०व्या स्थानावर पोहोचला आहे. रोहितला ७४८ रेटिंग मिळाले आहेत. तर कोहली सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. कोहलीला ३ स्थानांचा फायदा झाला आहे. कोहलीला ७७५ रेटिंग मिळाली आहे.

कसोटीत फलंदाजांच्या रँकिंगमध्ये न्यूझीलंडचा दिग्गज खेळाडू केन विल्यमसन्स टॉपवर आहेत. इंग्लंडचा ज्यो रूट दुसऱ्या स्थानावर आहे. तर ऑस्ट्रेलियाचा खेळाडू स्टीव्ह स्मिथ तिसऱ्या स्थानावर आहेत. मार्नस लाबुशेनला तीन स्थानांनी फायदा झाला आहे. तो चौथ्या स्थानावर पोहोचला आहे.

जर कसोटीची गोलंदाजी रँकिंग पाहिली तर टीम इंडियाचा स्पिनर रवीचंद्रन अश्विन टॉपवर आहे. ऑस्ट्रेलियाचा खेळाडू पॅट कमिन्सला एका स्थानाने फायदा झाला आहे तो दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज कॅगिसो रबाडाला एका स्थानाचे नुकसान झाले आहे. तो तिसऱ्या स्थानावर आला आहे. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला एका स्थानाने फायदा झाला आहे. तो चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. तर रवींद्र जडेजा पाचव्या स्थानावर आहे.

Comments
Add Comment