Monday, January 12, 2026

इंधन टँकर चालकांचे मध्यरात्रीपासून पुन्हा स्टेअरिंग छोडो आंदोलन

इंधन टँकर चालकांचे मध्यरात्रीपासून पुन्हा स्टेअरिंग छोडो आंदोलन

हिट अँड रन कायद्याविरोधात टँकर चालकांच्या भावना तीव्र

मनमाड : सकाळपासून भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम व इंडियन ऑइल प्रकल्पातून एकही इंधनाचा टँकर भरून बाहेर पडला नाही. त्यामुळे इंधन पुरवठा ठप्प झाल्याने उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा तसेच अनेक जिल्ह्यात इंधन तुटवडा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

एकही टँकरचालक आला नाही

देशात नवीन वाहन कायदा येणार आहे. या कायद्यातील तरतुदींच्या विरोधात ट्रक, टँकर चालकांनी एक जानेवारी रोजी संप पुकारला होता. दोन दिवस हा संप सुरु होता. त्यानंतर दोन जानेवारी रोजी मनमाड येथे जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेतली. त्यानंतर तोडगा निघाल्यावर एचपीसीएल, बीपीसीएल, इंडीयन ऑईल आणि गॅस प्लँटमधून टँकर रवाना झाले होते. परंतु आता दहा जानेवारीपासून पुन्हा संप सुरु झाला आहे. अनेक चालक आज टँकर भरण्यासाठी आले नाही.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >