जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या 'त्या' कर्मचाऱ्याची सेवा समाप्त?

  225

पोस्टाने पत्र रवाना, मूळ गुन्हेगारांना अभय देणार की फौजदारी करणार


नाशिक : 'गोंधळी की झाड गल्ली १२?' या मथळ्याखाली 'दै. प्रहार'ने जिल्हा शासकीय रुग्णालयातील बनावट जात प्रमाणपत्राचा गोंधळ आणि त्याची चौकशी करताना जिल्हा शल्य चिकित्सकांनी केलेली पत्रचाराची पतंगबाजी निदर्शनास आणली होती. या वृत्ताची शाई सुकते ना सुकते तोच "त्या" कर्मचाऱ्याची सेवा संपुष्टात आणण्यासंदर्भातले जिल्हा शल्य चिकित्सकांच्या सहीचे पत्र पोस्टाने त्याच्या घरी पाठवण्यात आल्याचे वृत्त आहे.



मात्र या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असलेल्या त्या महिला कर्मचाऱ्यावर काय कारवाई करणार? त्या महिला कर्मचाऱ्याने स्वेच्छा निवृत्तीनंतर मिळवलेले कथित जात प्रमाणपत्र कुठल्या सक्षम अधिकाऱ्याने दिले? ते खोटे होते म्हणून त्या वारस कर्मचाऱ्याची सेवा संपुष्टात आणली जात असेल तर ते प्रमाणपत्र सादर करणारी सेवा निवृत्त महिला कर्मचारी, प्रमाणपत्र देणारे सक्षम अधिकारी, ते जात प्रमाणपत्र स्वीकारून वारसाला नोकरी देऊ करणारे तत्कालीन प्रशासन अधिकारी, क्लार्क यांच्यावर कारवाई होणार का? हा गंभीर प्रकार असल्याने, बनावट दस्त तयार करणे, शासनाची दिशाभूल करणे, फसवणूक करणे आदी गंभीर कलमाखाली फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल होईल का? आदी प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहेत. त्या कर्मचाऱ्याची सेवा संपुष्टात आणून या प्रकरणावर पडदा टाकीत इतर दोषींना वाचविता येणार नाही, अशा प्रतिक्रिया आता जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या वर्तुळात ऐकायला मिळत आहेत.

Comments
Add Comment

Mohammad Shami: कोलकाता उच्च न्यायालयाकडून मोहम्मद शमीला मोठा झटका

नवी दिल्ली: कोलकाता उच्च न्यायालयाकडून क्रिकेटर मोहम्मद शमीला मोठा झटका बसला आहे. उच्च न्यायालयाने शमीला त्याची

“पक्षाने माझ्यावर उपकार केलेत” - रविंद्र चव्हाण

भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यावर व्यक्त केले मनोगत मुंबई : अतिशय सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या

टाकीचा स्लॅब कोसळून चिमुकल्यांच्या मृत्यू प्रकरणी दोन अधिकाऱ्यांचे निलंबन

आमदार निकोलेंच्या प्रश्नावर पाणीपुरवठा मंत्र्यांची कारवाई पालघर : डहाणू तालुक्यातील गट ग्रामपंचायत चळणी

बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार

मुंबई : बीड येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन

अधिक व्याजाचे आमिष देणाऱ्या योजनांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम

मुंबई : राज्यात अधिक व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगात तीन नवीन सदस्यांची नियुक्ती

राजीव निवतकर व महेंद्र वारभुवन यांचा शपथविधी मुंबई : राज्य शासनाकडून महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगावर