Tamilnadu rain : तामिळनाडूमध्ये अतिवृष्टीमुळे शाळांना दिली सुट्टी

काही विद्यापीठांच्या परिक्षाही ढकलण्यात आल्या पुढे


चेन्नई : देशात इतर राज्यांमध्ये कडाक्याची थंडी (Winter) आहे, तर तामिळनाडूमध्ये मात्र मुसळधार पाऊस (Tamilnadu rain) सुरु आहे. काल या ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्व जिल्ह्यांतील शाळांना सुट्टी (Holiday) जाहीर करण्यात आली, तर काही विद्यापीठांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात (Exams postponed) आल्या.


तमिळनाडूत अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाने हजेरी लावली. राज्यातील कुड्डलोर, विल्लुपूरम, मायिलाडुथुराई, नागापट्टण, रानिपेट, वेल्लोर, तिरूवन्नमलाई, तिरूवरूर, कल्लाकुरिची आणि चेंगालपट्टू आदी जिल्ह्यांत मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन या सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शाळा-महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्याचा निर्णय घेतला.


अण्णामलाई विद्यापीठानेही पावसामुळे सुटी जाहीर केली. विद्यापीठाच्या परिपत्रकात म्हटले आहे, की पावसामुळे विद्यापीठाची तसेच विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयाची नियोजित परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. परीक्षेची नवीन तारीख नंतर घोषित करण्यात येईल. तमिळनाडूप्रमाणेच पुदुच्चेरीतही मुसळधार पावसामुळे शाळा-महाविद्यालयांना सुटी देण्यात आली. नुकतेच डिसेंबरमध्ये दक्षिण तमिळनाडूतील काही जिल्ह्यांना अतिवृष्टीचा तडाखा बसला होता.



तमिळनाडूत अनेक ठिकाणी पावसाची शक्यता


तमिळनाडूत अनेक ठिकाणी पुढील सात दिवस विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. राज्यातील तिरूवरूर, नागापट्टण, कुड्डलोर आदी जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, पुदुच्चेरी व कराईकल भागात एक-दोन ठिकाणीही पावसाचा अंदाज आहे.



प्रमुख ठिकाणांचा पाऊस


नागापट्टण - १६.७ सेंमी


कराईकल - १२.२ सेंमी


पुदुच्चेरी - ९.६ सेंमी


कुड्डलोर - ९.३ सेंमी

Comments
Add Comment

रशियाकडून ६ कोटी बॅरल तेल खरेदी, एप्रिल महिन्यात होणार पुरवठा

नवी दिल्ली : आखाती देशातील युद्धस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताने रशियाकडून तब्बल ६ कोटी बॅरल तेलाची खरेदी केली

देशामध्ये १०० नवीन विमानतळ, २०० हेलीपॅड उभारणार, केंद्रीय मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत देशाच्या विमान वाहतूक, इमिग्रेशन आणि

देशभरात पेट्रोल-डिझेल, एलपीजीचा पुरवठा सुरळीत, सर्वपक्षीय बैठकीत सरकारची स्पष्टोक्ती

नवी दिल्ली  : पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज सर्वपक्षीय बैठकीचे

पीएनजी असलेल्या भागात एलपीजी पुरवठा होणार बंद

नवी दिल्ली : देशातील ऊर्जा साखळीत मोठी सुधारणा करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले

आकाशवाणीवरुन २६ मार्चपासून "वंदे मातरम्" राष्ट्रीय गीताची पूर्ण आवृत्तीचे प्रसारण

नवी दिल्ली : स्वातंत्र्यानंतर आकाशवाणी केंद्रांच्या सकाळच्या प्रसारणाची सुरुवात वैशिष्ट्यपूर्ण 'सिग्नेचर

सोनिया गांधी रुग्णालयात दाखल; प्रकृती स्थिर

नवी दिल्ली : पोटात संसर्ग झाल्याची तक्रार केल्यानंतर काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना मंगळवारी