Sunday, August 31, 2025

Tamilnadu rain : तामिळनाडूमध्ये अतिवृष्टीमुळे शाळांना दिली सुट्टी

Tamilnadu rain : तामिळनाडूमध्ये अतिवृष्टीमुळे शाळांना दिली सुट्टी

काही विद्यापीठांच्या परिक्षाही ढकलण्यात आल्या पुढे

चेन्नई : देशात इतर राज्यांमध्ये कडाक्याची थंडी (Winter) आहे, तर तामिळनाडूमध्ये मात्र मुसळधार पाऊस (Tamilnadu rain) सुरु आहे. काल या ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्व जिल्ह्यांतील शाळांना सुट्टी (Holiday) जाहीर करण्यात आली, तर काही विद्यापीठांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात (Exams postponed) आल्या.

तमिळनाडूत अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाने हजेरी लावली. राज्यातील कुड्डलोर, विल्लुपूरम, मायिलाडुथुराई, नागापट्टण, रानिपेट, वेल्लोर, तिरूवन्नमलाई, तिरूवरूर, कल्लाकुरिची आणि चेंगालपट्टू आदी जिल्ह्यांत मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन या सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शाळा-महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्याचा निर्णय घेतला.

अण्णामलाई विद्यापीठानेही पावसामुळे सुटी जाहीर केली. विद्यापीठाच्या परिपत्रकात म्हटले आहे, की पावसामुळे विद्यापीठाची तसेच विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयाची नियोजित परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. परीक्षेची नवीन तारीख नंतर घोषित करण्यात येईल. तमिळनाडूप्रमाणेच पुदुच्चेरीतही मुसळधार पावसामुळे शाळा-महाविद्यालयांना सुटी देण्यात आली. नुकतेच डिसेंबरमध्ये दक्षिण तमिळनाडूतील काही जिल्ह्यांना अतिवृष्टीचा तडाखा बसला होता.

तमिळनाडूत अनेक ठिकाणी पावसाची शक्यता

तमिळनाडूत अनेक ठिकाणी पुढील सात दिवस विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. राज्यातील तिरूवरूर, नागापट्टण, कुड्डलोर आदी जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, पुदुच्चेरी व कराईकल भागात एक-दोन ठिकाणीही पावसाचा अंदाज आहे.

प्रमुख ठिकाणांचा पाऊस

नागापट्टण - १६.७ सेंमी

कराईकल - १२.२ सेंमी

पुदुच्चेरी - ९.६ सेंमी

कुड्डलोर - ९.३ सेंमी

Comments
Add Comment