
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या लक्षद्वीप यात्रेवर मालदीवच्या काही मंत्र्यांनी आक्षेपार्ह विधान केल्याची किंमत या देशाला भोगावी लागत आहे. त्यांना त्यांच्या पर्यटनामध्ये नुकसान भोगावे लागत आहे. आता मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू यांना चीनमधून त्यांच्या देशात पर्यटक पाठवले जावेत यासाठी विनवणी करावी लागत आहे.
मोहम्मद मुईज्जू सोमवारपासून चीनच्या पाच दिवसीय राजकीय यात्रेवर आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदीविरुद्ध मालदीवचे मंत्र्यांनी अपमानजनक विधान केल्यानंतर बॉयकॉट मालदीव अशी भूमिका भारतातील अनेकजण घेत आहेत. भारतीय पर्यटकांकडून रिझर्व्हेशन कॅन्सल केल्यानंतर मालदीवचे राष्ट्रपती मुईज्जू यांनी मंगळवारी चीनला अपील केले की ते आपल्या देशातून सर्वाधिक पर्यटक पाठवावेत.
चीनच्या कौतुकादरम्यान काय म्हणाले मोहम्मद मुईज्जू?
आपल्या दौऱ्यादरम्यान, दुसऱ्या दिवशी मुईज्जूने फुजियान प्रांतात मालदीव बिझनेस फोरमला संबोधित करताना म्हटले की चीन सगळ्यात जवळचा सहकारी आणि विकासातील भागीदारीपैकी एक आहे. मुईज्जूने २०१४मध्ये चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंगकडून सुरू केलेल्या बेल्ट अँड रोन इनिशिएटिव्ह योजनेचे कौतुक केले.
चीनने मालदीवच्या इतिहासात पाहिलेली सर्वात महत्त्वाची योजना प्रदान केली आहे. यासोबतच त्यांनी चीनमधून मालदीवमध्ये आपल्या पर्यटकांचा प्रवाह वाढवण्याचा आग्रह केला आहे. त्यांनी अधिकृत वेबसाईटवर पोस्ट करण्यात आलेल्या एका रीडआऊटमध्ये म्हटले की, कोरोनाआधी चीन आमचा(मालदीवचा) नंबर एक बाजार होता आणि आमची मागणी आहे की चीनला हे स्थान पुन्हा प्राप्त करण्यासाठी आपले प्रयत्न वाढवावे लागतील.
या मंत्र्यांनी केले होते मोदींबाबत आक्षेपार्ह विधान
मुइज्जू सरकारने सोशल मीडियावर पंतप्रधान मोदींबाबत अपमानजनक विधआन केले होते. त्यानंतर मालदीव सरकारने तीन उप मंत्र्यांना निलंबित केले होते. सोबतच मालदीव असोसिएशन ऑफ टूरिझ्म इंडस्ट्रीनेही या आक्षेपार्ह विधानावर टीका केली होती.