नवी दिल्ली: इंडोनेशियाच्या(indonesia) तलौद द्वीप समूहात मंगळवारी ६.७ रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के(earthquake) जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सीस्मॉलॉजीनुसार भूकंपाचा केंद्र बिंदू जमिनीच्या खाली ८० किमी खोल होता. भारतीय वेळेनुसार भूकंपाचे झटके रात्री साधार २ वाजून १८ मिनिटांच्या सुमारास जाणवले.
नॅशनल सेंटर फॉर सीस्मॉलॉजीने एक्सवर पोस्ट करताना माहिती दिली की भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीच्या खाली ८० किमीवर होता. हे भूकंपाचे झटके इंडोनेशियाच्या तलौद द्वीपावर जाणवले. युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेने सांगितले की गेल्या गुरूवारी इंडोनेशियाच्या बलाई पुंगुटमध्ये भूकंपाचे वेगवान झटके जाणवले होते.
हानी नाही
इंडोनेशियात आलेल्या ६.७ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची हानी झाल्याचे वृत्त नाही. इंडोनेशियामध्ये वारंवार भूकंपाच्या घटना घडत आहे. यामागे तेथील भौगोलिक संरचना आहे.
इंडोनेशिया प्रशांत महासागरच्या रिंग ऑफ फायरमध्ये वसलेले आहे. याच कारणामुळे तेथे भूकंप येत असतात.