मुंबई: मारुती सुझुकीने(maruti suzuki) आपल्या एरिना लाईनअपवर या जानेवारीमध्ये ऑल्टो K10, वॅगन आर, स्विफ्ट आणि डिझायर सारख्या मॉडेल्सवर सूट आणि लाभ मिळत आहे. यात कॅश डिस्काऊंट, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट ऑफर सामील आहे. दरम्यान, ब्रीझा आणि अर्टिगावर सूट नाहीये. जाणून घेऊया कोणत्या मॉडेलवर किती डिस्काऊंट मिळत आहे
मारूती सुझुकी ऑल्टो K10
मारूती ऑल्टो K10च्या सर्व पेट्रोल आणि सीएनजी व्हेरिएंटवर ४७ हजार रूपयांपर्यंत सूट मिळत आहे. यात २५ हजार रूपयांपर्यंत कॅश डिस्काऊंट, १५ हजाररूपयांपर्तं एक्सचेंज बोनस आणि ७ हजार रूपयांपर्यंत कॉर्पोरेट डिस्काऊंट सामील आहे. ऑल्टो K10 १ लीटर, तीन सिलेंडर पेट्रोल इंजिन मिळत आहे.
मारूती सुझुकी एस प्रेसो
मारुती सुझुकी एस प्रेसो ऑल्टोसारखे 67hp,१.० लीटर इंजिन आहे. यात ५ स्पीड मॅन्युअल अथवा एएमची गिअर बॉक्सचा पर्याय मिळतो. यात सीएनजी व्हेरिएंटही सामील आहे. एस प्रेसोसह सर्व पेट्रोल व्हेरिएंटवर ४४ हजार रूपयांपर्यंत सूट मिळत आहे. यात २३ हजार रूपयांपर्यंतचा कॅश डिस्काऊंट, १५ हजार रूपयांपर्यंत एक्सचेंज बोनस आणि ६ हजार रूपयांपर्यंत कॉर्पोरेट डिस्काऊंट मिळत आहे. तर सीएनजी व्हेरिएंटवर केवळ १८ हजार रूपयांपर्यंतचा कॅश डिस्काऊंट मिळत आहे.
मारुती सुझुकी सेलेरियो
सेलेरियोच्या सर्व पेट्रोल आणि सीएनजी व्हेरिएंटवर ४४ हजार रूपयांपर्यंतचा एकूण डिस्काऊंट मिळत आहे.
मारुती सुझुकी वॅगन आर
मारुती सुझुकी वॅगनआरवर या महिन्यात ४१ हजार रूपयांपर्यंतचा डिस्काऊंट मिळत आहे. यात १५ हजार रूपयांपर्यंतचा कॅश लाभ, २० हजार रूपयांपर्यंत एक्सचेंज बोनस आणि ६ हजार रूपयांपर्यंत कॉर्पोरेट डिस्काऊंट सामील आहेत.यात १.० लीटर इंजिनसह सीएनजी व्हेरिएंटही उपलब्ध आहे यावर ३६ हजार रूपयांपर्यंत सूट मिळत आहे.
मारूती सुझुकी स्विफ्ट
स्विफ्टवर या महिन्यात ३७ हजार रूपयांपर्यंत डिस्काऊंट मिळत आहे. यात १० हजार रूपयांपर्यंतचा कॅश डिस्काऊंट, २० हजार रूपयांपर्यंत एक्सचेंज बोनस आणि ७ हजार रूपयांपर्यंत कॉर्पोरेट डिस्काऊंट सामील आहे. यातील सीएनजी व्हेरिएंटवर १५ हजार रूपयांचा एक्सचेंज बोनस आणि ७ हजार रूपयांचा कॉर्पोरेट बोनस मिळत आहे.
मारूती सुझुकी डिझायर
मारुती डिझायरमध्ये १७ हजार रूपयांपर्यंत डिस्काऊंट मिळत आहे. यात १० हजार रूपयांपर्यंत एक्सचेज बोनस आणि ७ हजार रूपयांचा कॉर्पोरेट बोनस सामील आहेत. यात कोणताही कॅश डिस्काऊंट मिळत नाहीये.