नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात आक्षेपार्ह विधान केल्यानंतर भारताचा मालदीववरील रोष काही कमी होत नाहीये. मालदीववर आता सामान्य लोकांसोहत भारताची दिग्गज ट्रॅव्हल कंपन्यांनीही आपला रोष व्यक्त करण्यात सुरूवात केली आहे.
देशातील मोठी ट्र्र्रॅव्हल कंपनी EaseMyTripने मालदीवचे आपले सर्व फ्लाईट्स बुकिंग रद्द केले आहेत. कंपनीचे फाऊंडर आणि सीईओ निशांत पिट्टी यांनी खुद्द सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली आहे. निशांत पिट्टी म्हणाले, देशाच्या एकजुटतेमध्ये सामील होत EaseMyTripने मालदीवचे सर्व फ्लाईट्स बुकिंग रद्द करण्यचा निर्णय घेतला आहे.
In solidarity with our nation, @EaseMyTrip has suspended all Maldives flight bookings ✈️ #TravelUpdate #SupportingNation #LakshadweepTourism #ExploreIndianlslands #Lakshadweep#ExploreIndianIslands @kishanreddybjp @JM_Scindia @PMOIndia @tourismgoi @narendramodi @incredibleindia https://t.co/wIyWGzyAZY
— Nishant Pitti (@nishantpitti) January 7, 2024
मालदीवच्या महिला मंत्री मरियम शिउना यांनी पंतप्रधान मोदींबाबत त्यांच्या लक्षद्वीप दौऱ्यावर आक्षेपार्ह विधान केले होते. हा मुद्दा भारताने मालदीवच्या मोहम्मद मुईज्जू सरकारसमक्ष उचलला होता. भारताने आक्षेप घेतल्यानंतर मालदीव सरकारकडून कारवाई करण्यात आली. मालदीवच्या तीन मंत्र्यांना या प्रकरणी निलंबित करण्यात आले.
मालदीव सरकारने कडक पावले उचलत उप मंत्री(युवा अधिकारिता, सूचना आणि कला मंत्रालय) मरियम शिऊना, उप मंत्री(परिवहन आणि नागरी उड्डाण मंत्रालय) हसन जिहान आणि उप मंत्री(युवा अधिकारिता सूचना आणि कला मंत्रालय) मालशा यांनी निलंबित केले.