Monday, May 12, 2025

क्रीडाताज्या घडामोडी

Ind vs Eng: इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत खेळणार नाही मोहम्मद शमी? समोर आले मोठे अपडेट

Ind vs Eng: इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत खेळणार नाही मोहम्मद शमी? समोर आले मोठे अपडेट

मुंबई: दक्षिण आफ्रिकेनंतर टीम इंडियाला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळायचे आहे. आता अशी बातमी समोर येत आहे की इंग्लंडविरुद्ध मोहम्मद शमी पहिल्या दोन कसोटी सामन्यात खेळू शकणार नाही. शमी भारतासाठी वर्ल्डकपच्या फायनलनंतर एकही सामना खेळलेला नाही. आधी दुखापतीमुळे तो संघाबाहेर होते.एका रिपोर्टनुसार मोहम्मद शमी इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यातून बाहेर होऊ शकतो.


सूत्रांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार शमीने आतापर्यंत गोलंदाजी सुरू केलेली नाही. त्याला आता नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये जाऊन आपला फिटनेस सिद्ध करावा लागेल. असे म्हटले जात आहे की तो इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटीत खेळू शकणार नाही. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा होणे बाकी आहे.



शमी नाही तर कोण?


मोहम्मद शमी जर इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटीत खेळणार नसेल तर जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराजशिवाय आणखी एक जबरदस्त फलंदाज शोधावा लागेल. कारण दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात मुकेश कुमार, बुमराह आणि सिराजने चांगली गोलंदाजी केली होती. मात्र प्रसिद्ध कृष्णा पूर्णपणे फ्लॉप ठरला होता. त्यामुळे कृष्णाला पुन्हा संधी मिळेल याची शक्यता कमी आहे.


इंग्लंडविरुद्ध भारत जानेवारी-मार्चमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे. पहिला कसोटी सामना २५ जानेवारीपासून तर दुसरा २ फेब्रुवारीपासून, तिसरा १५ फेब्रुवारीपासून, चौथा कसोटी सामना २३ फेब्रुवारीपासून तर पाचवा कसोटी सामना ७ मार्चपासून खेळवला जाणार आहे.


२०२२मध्ये दोन्ही संघ आमनेसामने आले होते तेव्हा ५ सामन्यांची कसोटी मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली होती.

Comments
Add Comment