Sunday, April 20, 2025
Homeक्रीडाIND vs AFG: ११ जानेवारीपासून भारत-अफगाणिस्तान मालिका होणार सुरू, जाणून घ्या वेळापत्रक

IND vs AFG: ११ जानेवारीपासून भारत-अफगाणिस्तान मालिका होणार सुरू, जाणून घ्या वेळापत्रक

मुंबई: २०२४ या वर्षात टी-२० मालिकेची सुरुवात भारत अफगाणिस्तानविरुद्ध करत आहे. या मालिकेत भारतीय संघात कोणते चेहरे असणार हे स्पष्ट झाले आबे. ११ जानेवारीपासून या मालिकेला सुरूवात होत आहे. दोन्ही संघांची यासाठी घोषणा झालेली आहे. जाणून घेऊया या मालिकेबद्दल…

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील पहिला टी-२० सामना ११ जानेवारीला मोहालीमध्ये खेळवला जाईल. या सामन्याची सुरूवात संध्याकाळी सात वाजल्यापासून होईल. यानंतर दोन्ही संघ इंदोरला जाणार आहेत. येथे दुसरा टी-२० सामना खेळवला जाईल. मालिकेतील शेवटचा आणि तिसरा टी-२० सामना बंगळुरूच्या के एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाईल. हे सर्व सामने संध्याकाळी सात वाजल्यापासून सुरू होतील.

टी-२०मध्ये रोहित, विराटचे पुनरागमन

अफगाणिस्तानविरुद्ध टी-२० मालिकेत रोहित शर्मा टीम इंडियाची कमान सांभाळणार आहे. त्यांच्यासोबत स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहलीचेही संघात पुनरागमन होत आहे. दोघेही दीर्घकाळानंतर भारतासाठी या फॉरमॅटमध्ये खेळताना दिसणार आहे. यासोबतच हे स्पष्ट होत आहे की दोन्ही खेळाडू २०२४ टी-२० विश्वचषकात टीम इंडियाचा भाग असणार आहेत.

भारत-अफगाणिस्तान टी-२० मालिकेचे वेळापत्रक

पहिला टी-२० सामना ११ जानेवारी -मोहाली
दुसरा टी-२० सामना १४ जानेवारी – इंदौर
तिसरा टी-२० सामना १७ जानेवारी – बंगळुरू

अफगाणिस्तान मालिकेसाठी टीम इंडिया – रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जायसवाल, विराट कोहली, तिलक वर्मा, रिंकू सिंह, जितेश शर्मा (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंगटन सुंदर, अक्षर पटेल, रवि बिश्वोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, मुकेश कुमार आणि आवेश खान.

भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी अफगाणिस्तानचा संघ – इब्राहिम जादरान (कर्णधार), रहमानुल्लाह गुरबाज (विकेटकीपर), इकराम अलीखिल (विकेटकीपर), हजरतुल्लाह जजई, रहमत शाह, नजीबुल्लाह जादरान, मोहम्मद नबी, करीम जनात, अजमतुल्लाह ओमरजई, शरफुद्दीन अशरफ, मुजीब उर रहमान, फजलहक फारूकी, फरीद अहमद, नवीन उल हक, नूर अहमद, मोहम्मद सलीम, कैस अहमद, गुलबदीन नैब आणि रशीद खान.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -