मुंबई: थंडीच्या दिवसांत तुम्ही हळदीचे ड्रिंक प्यायल्यास फिट आणि एनर्जेटिक राहू शकता. हळद एक असे सुपरफूड आहे जे थंडीत पिणे फायदेशीर असते.
हळदीमध्ये व्हिटामिन्स, मिनरल्स आणि अँटीऑक्सिडंटसारखी पोषकतत्वे असतात. हे सर्व पोषक गुण आपली रोगप्रतिकारक्षमता मजबूत करण्याचे काम करतात.
सोबत आपल्या शरीराला आतून उष्ण ठेवण्यासोबतच एनर्जेटिक ठेवतात. त्यामुळे थंडीच्या दिवसात हळदीचे ड्रिंक प्यायल्याने तुम्ही फिट राहू शकता.
असे बनवा ड्रिंक
एक चमचा हळद पावडर, २ कप पाणी, अर्धा चमचा बडिशेप, १ इंच आले, १ चमचा मध, थोडासा लिंबाचा रस
सगळ्यात आधी पाणी उकळून घ्या. त्यात हळद पावडर, बडिशेप आणि आल्याचा तुकडा टाका. त्यानंतर ते ग्लासात ओतून घ्या. आता यामध्ये मध आणि लिंबाचा रस मिसळा. गरमगरम प्या.
हळदीमध्ये करक्युमिन, झिंक आणि व्हिटामिन सी सारखी तत्वे असतात जे आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढवतात. यामुळे थंडीच्या दिवसात हळदीचे ड्रिंक जरूर प्यायले पाहिजे.