Tuesday, May 13, 2025

विदेशमहत्वाची बातमी

Bangladesh: बांगलादेशमध्ये पुन्हा शेख हसीना सरकार, ५व्यांदा बनणार पंतप्रधान

Bangladesh: बांगलादेशमध्ये पुन्हा शेख हसीना सरकार, ५व्यांदा बनणार पंतप्रधान

ढाका: बांगलादेशमध्ये(Bangladesh) पुन्हा एकदा शेख हसीना(sheikh hasina) पंतप्रधान बनत आहेत. रविवारी झालेल्या निवडणुकीत त्यांचा पक्ष आवामी लीगने ३०० पैकी दोन तृतीयांशहून अधिक जागा जिंकल्या आहेत. शेख हसीना पाचव्यांदा पंतप्रधान बनत आहेत. त्या २००९ पासून पंतप्रधान आहेत. याआधी १९९१ ते १९९६ दरम्यानही शेख हसीना पंतप्रधान होत्या.


आतापर्यंतच्या मतमोजणीत शेख हसीना यांचा पक्ष आवामी लीगने ३०० संसदीय जागांपैकी २२४ जागा जिंकल्या आहेत. बांगलादेश जातीय पक्षाने चार जागा जिंकल्या आहे. अपक्ष ६२ जागांवर तर इतरांच्या खात्यात एक जागा आहे. तर उरलेल्या दोन जागांवर मतमोजणी सुरू आहे.


शेख हसीना यांनी आपल्या मतदार विभाग गोपालगंज ३ येथून मोठ्या संख्येने विजय मिळवला आहे. त्यांना २,४९,९५६ मते मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी एम निजाम उद्दीन लश्कर यांना केवळ ४६९ मते मिळाली. गोपालगंज ३ येथून शेख हसीना १९८६पासून आतापर्यंत आठ वेळा जिंकल्या आहेत.


यासोबतच शेख हसीना यांना बांगलादेशात दीर्घकाळ पंतप्रधान बनण्याचा रेकॉर्ड केला आहे. त्या २००९ पासून पंतप्रधान आहेत.



केवळ ४० टक्के झाले मतदान


बांगलादेशात २०१८मध्ये झालेल्या निवडणुकीत ८० टक्के मतदान झाले होते. मात्र यावेळेस झालेल्या निवडणुकीला विरोधी पक्षाने बॉयकॉट केले होते. यामुळे निवडणुकीत केवळ ४० टक्के मतदान झाले.


निवडणुकीआधी बांगलादेशात अनेक ठिकाणी हिंसक घटनाही झाल्या होत्या. रविवारी मतदानादरम्यान देशभरात १८ ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या होत्या. यात १० मतदान केंद्रांना निशाणा बनवण्यात आले होते.

Comments
Add Comment