मुंबई: हल्ली बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळत आहे. सततचे जंक फूड, तसेच व्यायामाचा अभाव आणि झोपण्याच्या अनियमित वेळेमुळे अनेक आजार सामान्य झाले आहेत.जेवण जेवण्याचीही एक वेळ असते. बरेज जण रात्रीचे जेवण उशिरा करणे पसंत करतात. मात्र ही सवय आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. यामुळे आरोग्यास मोठे नुकसान पोहोचू शकते.
रात्रीचे जेवण हे झोपण्याच्या तीन तास आधी खाल्ले पाहिजे. म्हणजेच जेवण आणि झोपण्यामध्ये तीन तासांचे अंतर असले पाहिजे. असे केल्याने जेवण लवकर पचण्यास मदत होते.
रात्रीचे जेवण लवकर केल्याने आरोग्यासही अनेक लाभ होतात. लवकर जेवल्याने चांगली झोप लागते.
लठ्ठपणा वाढत नाही.
सोबतच बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो.