क्राइम – अॅड. रिया करंजकर
आपला माल खपावा म्हणून टीव्ही व इतर माध्यमातून जाहिरात केल्या जातात. जेणेकरून लोकं ते बघतील व आपला माल विकत घेऊन आपला आर्थिक फायदा होईल. यासाठी सर्रास कंपन्या जाहिरात करतात. अशा जाहिरातींना गिऱ्हाईकही बळी पडतो, माल विकत घेतो. अशीच जाहिरात आज-काल प्रसारमाध्यमातून होत आहे ती म्हणजे ऑनलाइन गेमच्या ॲपची. तुम्ही हे ॲप डाऊनलोड करा आणि अमुक अमुक गेम खेळा, त्यात तुम्ही एवढे पैसे जिंकाल, तुमची स्वप्न तुम्ही पूर्ण कराल, अशा प्रकारच्या ॲपबद्दल जाहिरात असतात. त्यासाठी काही महिला, पुरुष हे जाहिरात करतात की, आम्ही हा गेम खेळलो. एवढे पैसे जिंकले. आम्ही आमची स्वप्न पूर्ण केली. लोकांना या जाहिरातींची भुरळ पडते. ते या जाहिरातीला बळी पडतात.
राजेशला त्याच्या ओळखीच्या मित्राने रमेश आणि संजय यांनी बिंगो रॉलिटी नावाचा जुगार खेळण्यासाठी ॲप डाऊनलोड करण्यासाठी सांगितले; पण राजेश ते ॲप डाऊनलोड करत नव्हता. तरीही त्या दोघांनी त्या ॲपची लिंक त्याच्या मोबाइल नंबरवर काढून जबरदस्तीने तो गेम त्याच्या मोबाइलवर डाऊनलोड करून दिला. एवढेच नाही तर तो गेम खेळण्यासाठी लागणारा मेन आयडी व पासवर्ड पाठवून एक पॉइंटला ३६ रुपये या दराने पैसे मिळतील असे सांगून. प्रत्येक वेळा राजेश अामिषाला बळी पाडून लागले. राजश्री या बिंगो रोलेटी जुगारचे सतत खेळता खेळता त्याला व्यसन लागले. यामध्ये त्याची ४५ लाख ४४ हजार ३१५ची आर्थिक फसवणूक झाली. राजेशने या गुन्ह्याबद्दल पोलीस स्टेशनमध्ये सुरेश आणि संजय विरुद्ध आर्थिक फसवणुकीबाबत गुन्हा नोंदवलेला आहे. हा जुगार आर्थिक फसवणुकीचे साधन बनलेले आहे. ऑनलाइन जुगारामुळे तरुणांचे आणि विद्यार्थ्यांचे मोठे आर्थिक व कौटुंबिक नुकसान होत असून काही तरुण आत्महत्याही करत आहेत. तर काही तरुण जिंकण्याच्या आमिषाने कर्जबाजारी होत आहेत. या जुगारामुळे त्यांना जे आर्थिक नुकसान झाले आहे, त्यासाठी किंवा फसवणूक झालेली आहे, या सर्व गोष्टींसाठी तरुणांना आपली घरे, दुकाने, मोटर वाहने, स्थिरस्थावर मालमत्ता विकावी लागत आहे. काही लोक आपल्या आर्थिक बाबींसाठी दुसऱ्या तरुणांना हा जुगार खेळण्यासाठी भाग पाडून त्या लोकांचे आर्थिक नुकसान करत आहेत.
सतत तरुण मुले, विद्यार्थी हे ऑनलाईन गेम खेळण्यातच मग्न झालेले दिसून येतात. त्यासाठी ते आपल्या आई-वडिलांचे मोबाइल स्वतःच्या ताब्यात ठेवतात. आई-वडिलांनी जर मोबाइल मागितले, तर घरामध्येही तमाशा करतात. हे सर्व ऑनलाइन गेममुळे होत असून, विद्यार्थ्यांचे आणि तरुणांचे नुकसान होत चाललेले आहे.
(सत्यघटनेवर आधारित)