मुंबई: तीळ आपल्या शरीरासाठी अतिशय फायदेशीर असतात. तिळाचे सेवन थंडीमध्ये केले जाते. कारण तीळ हे उष्ण असतात. थंडीच्या दिवसांत लोक तिळाचे लाडू, हलवा बनवून खातात. यात अनेक प्रकारची पोषकतत्वे असतात जसे कॅल्शियम, आर्यन, पोटॅशियम, प्रोटीन, व्हिटमीन ए, सी आणि सोडियम आढळतात.
महिलांनी तिळाचे सेवन जरूर करावे. यामुळे अनेक प्रकारच्या समस्यांपासून सुटका होते. जाणून घेऊया तिळाचे फायदे
हाडे मजबूत बनतात– तीळामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते. याचे सेवन केल्याने हाडाच्या सर्व समस्या दूर होतात. याचे सेवन केल्याने शरीराचा थकवा दूर होतो.
अनियमित पीरियडची समस्या होते दूर – अनेक महिलांमध्ये अनियमित पाळीचा त्रास असतो. याचे मुख्य कारण खराब लाईफस्टाईल. तिळाचे सेवन केल्याने या समस्येपासून सुटका मिळते. तिळामध्ये फॅटी अॅसिड असतात जे पीरियड्स रेग्युलर करण्यास मदत करतात.
हार्मोन्स नियंत्रित ठेवतात – तिळामध्ये व्हिटामिन सी आढळते जे शरीरात अॅस्ट्रोजनची पातळी वाढवतात. तीळमध्ये अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट आणि अँटी बॅक्टेरियलही गुण आढळतात. यामुळे हार्मोन्स नियंत्रित राखण्याचे काम होते.
त्वचेसाठी फायदेशीर – तीळ हे त्वचेसाठी अतिशय फायदेशीर आहेत. याच्या मदतीने त्वचेला जरूरी पोषण मिळते. यामुळे शरीरात ओलावा कायम राहतो.
एनर्जी वाढते – महिला दिवसभर काही ना काही काम करत असतात ज्यामुळे त्याच्या शरीरात एनर्जीची कमतरता होते अशातच तिळाचे सेवन रोज केल्यास शरीरात एनर्जी वाढते.