नरेश नि त्याची बायको, माय-बापाजवळच राहिले. “थोडे सहनशील व्हायला शिका. उरलं पुरलं सासू बघते. घरात कुलुपं लावायची डोकेदुखी नाही. दूध तापवलं का? अन्न उघडं राहिलं का? नो कटकट. सासू बघते. कटकट कानाआड करायची. मात्र तेवढं जमलं की सबकुछ जम्या.” नरेशच्या बायकोने सांगितलेली फायदेमंद बाजू मी ऐवढ्यासाठी सांगितली की, आजकालच्या नोकरदार बायांना त्यापासून बोध मिळावा. शिवाय मुलं झाली की किती फायदेमंद सौदा ना! आजी-आजोबा बाळांचं दूध पीत नाहीत. मंगेश पाडगावकरांचा ‘चांदण्यांचा झुला’ घरोघरी लागतो. शिवाय संस्कार हो! चांगले संस्कार मुलांवर घडतात. असो. फायदेमंद सौदा नरेशच्या बायकोनं वापरला नि ती सुखी झाली…
नरेश-सुधन्वा ही जोडी एका शाळेत एका बाकावर शिकली. अगदी एक ते दहा इयत्ता, विशेष म्हणजे दोघांना दहावी-बारावीला उत्तम गुण मिळाले. पर्सेंटेजही आसपास! दोघं ग्रॅज्युएट झाले. नरेशने बाबांचे अॅक्सेसरीजचे दुकान चालवायला घेतले. दुकान उत्तम चालत होते. नरेश म्हणाला, “बाबा, आता तुम्ही पेन्शनीत जा! मी देईन! नक्की व्यवस्थित रोकड खर्चायला देईन. तुम्हाला नि आईला स्वाभिमानाने जगता येईल इतकी छान.” अर्थात वेगळा संसार न थाटता आई-बाप जवळ करूनच नरेश राहिला.
सुदैवानं बायको बोटचेपी होती. ऐकणारी होती. बरीच बरी होती. नरेश नि त्याची बायको, माय-बापाजवळच राहिले. “थोडे सहनशील व्हायला शिका. उरलं पुरलं सासू बघते. घरात कुलुपं लावायची डोकेदुखी नाही. दूध तापवलं का? अन्न उघडं राहिलं का? नो कटकट. सासू बघते. कटकट कानाआड करायची. मात्र तेवढं जमलं की सबकुछ जम्या.” नरेशच्या बायकोने सांगितलेली फायदेमंद बाजू मी ऐवढ्यासाठी सांगितली की, आजकालच्या नोकरदार बायांना त्यापासून बोध मिळावा. शिवाय मुलं झाली की किती फायदेमंद सौदा ना! आजी-आजोबा बाळांचं दूध पीत नाहीत. मंगेश पाडगावकरांचा ‘चांदण्यांचा झुला’ घरोघरी लागतो. शिवाय संस्कार हो! चांगले संस्कार मुलांवर घडतात. असो. फायदेमंद सौदा नरेशच्या बायकोनं वापरला नि ती सुखी झाली. दोन्ही मुलं आजी-आजोबांकडे सोपवून बँकेत सुखाने नोकरीस जाऊ लागली. नरेश खूश होता. डबल इन्कम ना!
मित्र सुधन्वा शेजारीच ‘विविधा’ साडी भांडार हे त्यांचे पारंपरिक दुकान चालवीत. मित्र म्हणून जोडीला नरेश होताच. एकत्र डबा खाणे, शेअर करणे, शाळा, कॉलेज आणि आता दुकान पण चालूच होते. जोडी जोडी कायम घट्ट होती. मित्र-मित्र, मैत्री, तश्शीच स्नेहशील
राहिली होती.
“आजकाल साड्या उठत नाहीत रे मित्रा. हल्ली बायका लांडे कपडे काय वापरतात. पंजाबी ड्रेस काय घालतात… पण साडी? अहं!”
“हे बघ फ्रेंड, दुनिया गोल आहे. परत साडी ट्रेंड येईल.”
“तोवर मी म्हातारा होईन
त्याचं काय?”
“असं घडणार नाही. बांदेकरांकडे तुझ्या पैठण्या खपतील.
“मी स्वत: प्रयत्न करतो.”
“कोण? ते आदेश बांदेकर?”
“हो हो! आदेश बांदेकर. नेहमीपेक्षा वीस-पंचवीस रुपये स्वस्त देतो.”
“अरे, त्याला टीव्ही देतात पैशे. नो
सोदा बैदा”
असं ते ठरलं नि आदेशही मानलं. मौजच ना! नरेश जेहत्ते कालाचे ठायी सुखी झाला. मित्राचे आभार मानत पैठणी बिझनेस शुरू हो गया!
दोघे मित्र सुखी झाले. ‘पैठणी’ बिकती गयी. बांदेकरके साथ पैठणीकी दोस्ती दोनो मित्रोंको सुख देती गयी.
“अरे, सुध्या, ती निळी पैठणी आपल्यातली नव्हती रे. काल त्या काशीकर वहिनी जिंकल्या ती
निळी पैठणी?”
“काल विसरलो मी मित्रा. दुसरे काम आले ते केले. बांदेकरांने स्टॉकमधली वापरली.” नरेशचे सुध्याच्या उत्तराने समाधान झाले.
नि तो विसरून गेला.
पण मग पुन्हा एकदा असाच प्रसंग आला तेव्हा तो बायकोला म्हणाला, “सुध्या फार फार विसरभोळा होत
चालला आहे.”
“का हो ? असं का म्हणता?”
“माझ्या पैठण्या खपवतो, म्हणून मानायचो ना त्याला?”
“मग?”
“सुध्या पार्टनरशिपमध्ये
धंदा करतोय!”
“बघतेच आता भावजींकडे.”
“भांडू बिंडू नको हं.”
“तुमची फ्रेंडशिप तुटणार नाही, यवढी काळजी घेईन.” बायकोने शब्द दिला. नरेशचे समाधान झाले.
पण चमत्कार झाला. नरेशच्या बायकोला ‘पैठणी’ प्रोग्रॅममध्ये बोलावले गेले. नरेश असली संधी सोडतो थोडीच? आदेश बांदेकर भेटलेच.
“आभारी आहे आपला. रोज पैठणी आमच्या दुकानातून जाते.”
“हो का? मला ठाऊक नाही. प्रायोजक आणून देतात. मी फक्त ज्या वहिनी पुढ्यात जिंकतील त्यांना ती हसून देतो. वहिनी खूश की मी खूश!”
नरेश थोडा नर्व्हस झाला. पण मित्रा सुध्या बरोबर होता म्हणून त्याने विषय वाढवला नाही. “आपल्याला काय? पैठणीशी नि ती विकली जाण्याशी मतलब!” बायको व्यवहाराचे बोलली.
पण ती निळी पैठणी? भुंगा डोकं पोखरतच होता. निळी पैठणी माझी नाही. हेच ते घोषवाक्य मनभर घुमघुमणारं. सुध्याचं दुकान नि नरेशचं दुकान मांडीला मांडी घालून शेजारी शेजारी होतं.
“अहो, आता अति झालं सांगून टाका. टीव्हीत शूटिंग सुरू होण्याआधी सांगून टाका.”
“हो.” त्याने होकार भरला मग म्हणाला, “मित्रा, तुझा व्यवसाय अति चांगला चालवा, म्हणून मी रोज पैठणी विकत घेत होतो. बांदेकराच्या नावावर माझं चालू होतं.”
“काय सांगतोस काय?” “मी फार खूश होतो रे!”
“तुझी खुशी ती माझी खुशी!”
“तुला बघायचंय?”
“हो. बघायचंय.”
दोघे मित्र दुकानात गेले. प्रोग्रॅम संपताच कूच केले.
“बघ, सुध्या आत ये.” दोघं पडद्याआड गेले.
“बघ.” मित्र बघत राहिला. बांदेकरच्या विकलेल्या पैठण्यांची घडीवर घडी! मित्रप्रेमाखातर! असं प्रेम कुणी कधी पाहिलं आहे का?
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…