Thursday, March 27, 2025
Homeक्रीडाDavid Warner:रिटायरमेंटनंतर डेविड वॉर्नरचा फ्युचर प्लान आला समोर

David Warner:रिटायरमेंटनंतर डेविड वॉर्नरचा फ्युचर प्लान आला समोर

मुंबई: ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेविड वॉर्नरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात ३ कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात आली. ही डेविड वॉर्नरची शेवटची मालिका होती. ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला ३-० असे हरवत वॉर्नरला अविस्मरणीय अलविदा केले. मात्र आता रिटायर झाल्यानंतर डेविड वॉर्नर काय करणार आहे? डेविड वॉर्नरची भविष्यातील रणनीती काय असणार आहे? याचे उत्तर खुद्द डेविड वॉर्नरने दिले आहे.

पत्नीकडून घ्यावी लागणार परवानगी

पाकिस्तानविरुद्ध फेअरवेल कसोटीनंतर डेविड वॉर्नरने सांगितले की तो भविष्यात कोचिंगमध्ये करिअर करू इच्छितो. सोबतच तो म्हणाला यासाठी सगळ्यात आधी पत्नीशी बोलेन. ज्यामुळे काही दिवस घरापासून दूर राहण्याची परवानगी मिळेल. डेविड वॉर्नर क्रिकेटमधून रिटायर झाल्यानंतर आगामी दिवसांत कोचिंगला करिअरच्या दिशेने पाहत आहे. मात्र त्याने स्पष्ट केलेय की यासाठी तो पत्नीकडून परवानगी घेईल.

वॉर्नरने ११२ कसोटी सामन्यांमधील २०५ डावांत ४४.५९च्या सरासरीने ८.७८६ धावा केल्यात. यात २६ शतके आणि ३७ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची सर्वोत्कृष्ट धावसंख्या ३३५ इतकी आहे. तो ऑस्ट्रेलियासाठी कसोटीत पाचवा सर्वाधिक धावा कऱणारा खेळाडू आहे. वॉर्नरने १५९ वनडे सामन्यांमध्ये २२ शतके आणि ३३ अर्धशतकांसह ४५.३०च्या सरासरीने ६,९३२ धावा केल्या आहेत. तो वनडे सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक धावा करणारा सहावा खेळाडू आहे. त्याची वनडेतील सर्वोत्कृष्ट धावसंख्या १७९ आहे.

वॉर्नर टी-२० खेळत राहणार आहे कारण एक जूनपासून वेस्ट इंडिज आणि अमेरिका यांच्यात आयसीसी टी-२० विश्वचषक होणार आहे. त्याने आतापर्यंत ९९ टी-२० सामने खेळले आहेत यात ९९ डावांत त्याने ३२.८८च्या सरासरीने २८९४ धावा केल्यात. यात एक शतक आणि २४ अर्धशतकांचा समावेश आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -