Coastal Road : कोस्टल रोडचं ८३% काम पूर्ण; याच महिन्यात होणार खुला

मुंबई ते रायगड अंतर बारा मिनिटांत कापता येणार


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली माहिती


मुंबई : मुंबईच्या लोकसंख्येत (Mumbai Population) आणि पर्यायाने वाहतूक कोंडीत (Traffic Jam) दिवसेंदिवस वाढ होत आहे. नेहमीच्या ट्रॅफिक जामला मुंबईकर वैतागले असतानाच एक दिलासादायक बाब समोर आली आहे. मुंबईच्या दृष्टीने अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या कोस्टल रोडचं (Coastal Road) ८३% काम पूर्ण झालं आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी कमी होणार आहे. जानेवारी अखेरपर्यंत मुंबईकरांकरता कोस्टल रोडच्या पहिला टप्प्याचे काम पूर्ण होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिली. मुंबई आयुक्त इक्बाल चहल हे देखील यावेळी उपस्थित होते.


कोस्टल रोडची पाहणी झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, कोस्टल रोडच्या एका टनलचं (Tunnel) काम मरीन ड्राईव्ह ते वरळी सी-फेस ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण होणार असून लवकरच त्याचे उद्घाटन होणार आहे. तर दुसऱ्या टनलचं काम मे २०२४ पर्यंत पूर्ण होईल. दोन्ही बोगद्यांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. दुर्घटना घडल्यास किंवा आग लागल्यास धूर बाहेर फेकला जाईल अशी प्रणाली करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.



मविआ सरकारवर साधला निशाणा


मुख्यमंत्री म्हणाले, कोस्टल रोड ३१ जानेवारीला सुरु होईल. एमटीएचएल १२ जानेवारीला खुला होईल. यामुळे १२ मिनिटांत रायगड जिल्ह्यात जाता येणार आहे. हे सर्व विकासाचे प्रकल्प आहे. कोस्टल रोड वरळीपर्यंत न थांबता वांद्रे - वर्सोवा आणि वर्सोवा ते विरार जाता येणार आहे. ही सर्व रखडलेली काम होती, आधीच्या लोकांनी ही कामं बंद पाडली होती, गतीमान पद्धतीनं आपण काम करतोय, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी मविआ सरकारवर निशाणा साधला.



मुंबईला होणारा धोका टाळण्यासाठी दर सहा महिन्यांनी दिला जातो अहवाल


राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था या समुद्राच्या अभ्यास करणार्‍या यंत्रणेने कोस्टल रोडच्या कामामुळे समुद्रावर होणारा परिणाम, समुद्राचे तापमान, लाटांचा पॅटर्न, गढूळपणा यांचा अभ्यास केला. दर सहा महिन्यांनी सरकारकडे या यंत्रणेकडून अहवाल दिला जातो. त्यामुळे समुद्रातील आगामी धोक्यांची सूचना यंत्रणेला मिळू शकते .


तसेच कोस्टल रोड आणि पर्यायाने मुंबईचं संरक्षण करणारी समुद्र भिंत श्रीलंका आणि फ्रान्स या देशांतील कामांचा अभ्यास करुन बनवली गेली आहे. समुद्र भिंत बांधतांना नैसर्गिक खडक समुद्रातील जैवविवीधतेला पुरक असे निवडले गेले आहेत. समुद्र लाटांचा प्रभाव कमी करणारे तंत्र समुद्र भिंत बांधतांना वापरले गेले आहेत, ज्यामुळे मुंबईला संभाव्य धोक्यांपासून वाचवता येणार आहे.


Comments
Add Comment

मुंबईतील कचरा खासगीकरणाच्या निविदेला विलंब

खास प्रतिनिधी, मुंबई : मुंबई महापालिकेच्या सफाई खात्याच्यावतीने कचरा उचलण्यासाठी वाहनांसह मनुष्यबळ

दुर्गंधी पसरत नाही की कचरा दिसत नाही, मुंबईतल्या अनोख्या कचरापेट्या

सचिन धानजी, मुंबई : मुंबईत आज कुणालाच आपल्या घरासमोर कचरा नको असतो. तसेच सार्वजनिक कचरा पेट्या असल्यास त्या

मुंबईत साथीच्या आजारांचे वाढले प्रमाण

मुंबई : गेल्या पंधरावड्यात साथीच्या आजारांनी पुन्हा डोके वर काढले. सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात

'आपली एसटी' ॲपद्वारे कळणार लालपरीचा ठावठिकाणा - प्रताप सरनाईक

मुंबई : प्रत्येक थांब्यावर एसटीची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना एसटीचा अचुक ठावठीकाणा काळावा

नवी मुंबई विमानतळामुळे महामार्गावर 'ट्रॅफिक कोंडी'चा धोका!

विमानतळासाठी वाहतूक 'वळवणार'; पाम बीच रोडवरील गर्दी टाळण्यासाठी 'सिक्रेट प्लॅन' लागू नवी मुंबई: नवी मुंबई

तब्बल १५ वर्षांपासून महिला होती त्रस्त, महापालिका रुग्णालयातील डॉक्टरांनी कायमची केली त्रासातून मुक्तता ..

मुंबई (खास प्रतिनिधी) : रजोनिवृत्तीनंतरच्या रक्तस्त्रावाच्या समस्येमुळे त्रस्त असलेल्य ६५ वर्षीय महिलेवर