मुंबई: दीपिका पदुकोण बॉलीवूड इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. गेल्या १८ वर्षांपासून ती बॉलिवूडमध्ये अॅक्टिव्ह आहे. ५ जानेवारीला तिने आपला वाढदिवस साजरा केला. केवळ बॉलिवूडच नव्हे तर हॉलिवूडमध्येही तिने आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे. मात्र दीपिकाबद्दल एक अशी गोष्ट आहे जी फार कमी लोकांना माहीत आहे.
ओम शांती ओमने बनवले सुपरस्टार
दीपिका पदुकोणने शाहरूख खानचा सिनेमा ओम शांती ओम सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यात त्याची जोडी किंग खानसोबत होती. ९ नोव्हेंबर २००७मध्ये रिलीज झालेला ओम शांती ओम बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. यानंतर दीपिका पदुकोण एका रात्रीत सुपरस्टार बनली होती. ओम शांती ओम दीपिका पदुकोणचा पहिला सिनेमा सांगितला जातो. मात्र असे नाहीये. तिने एका दाक्षिणात्य सिनेमातून अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले होते.
या सिनेमातून दीपिकाच्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरूवात
ओम शांती ओमच्या ठीक एक वर्ष आधी म्हणजेच २००६मध्ये दीपिका पदुकोण कन्नड सिनेमा ऐश्वर्यामध्ये दिसली होती. तिने दाक्षिणात्य अभिनेता उपेंद्रसोबत स्क्रीन शेअर केली होती. या सिनेमाचे टायटल बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या हे आहे. यात तिच्या अभिनयाचे कौतुक झाले मात्र तिला ओळख मिळाली नाही. यानंतर दीपिकाने बॉलिवूडमध्ये आपले पाय ठेवले आणि आज जी ज्या ठिकाणी पोहोचली ते सर्वांनाच माहीत आहे.