Monday, May 19, 2025

रिलॅक्स

Online Fraud : यूट्यूबवरील व्हीडिओ लाइक करण्याचे पार्टटाइम काम

Online Fraud : यूट्यूबवरील व्हीडिओ लाइक करण्याचे पार्टटाइम काम

महिलेची ५५ लाखांची फसवणूक


गोलमाल : महेश पांचाळ


दक्षिण मुंबईत राहणाऱ्या ४७ वर्षीय हेमांगी झुनझुनवाला यांना आर्या नावाच्या मुलीने तिला व्हॉट्सअॅपवर मॅसेज पाठवला होता. यूट्यूबवर व्हीडिओ लाइक करण्याच्या अर्धवेळ नोकरीची हेमांगी यांना ऑफर दिली होती. ही ऑफर स्वीकारून झुनझुनवालाने व्हीडिओ लाइक करण्याचे काम सुरू केले. सुरुवातीला यासाठी तिला पैसे मिळाले. त्यानंतर तिला फी आकारून टास्क ऑफर करून एकूण ५५.३५ लाख रुपये वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यास सांगितले. त्यानुसार, हेमांगी यांनी पैसे जमा केले. मात्र काही काळानंतर झुनझुनवाला यांना देयके मिळणे बंद झाले. यामुळे व्यथित होऊन तिने (Online Fraud) एफआयआर नोंदवण्यासाठी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलशी संपर्क साधला.


आपली फसवणूक झाल्याची तक्रार हेमांगी यांनी सायबर सेलकडे नोंदवली. त्यानंतर दक्षिण सायबर सेलने तपास केला असता, झुनझुनवालाने ट्रान्सफर केलेल्या ५५.३५ लाख रुपयांपैकी १४.५० लाख रुपये नागपुरातील बँक खात्यात जमा झाल्याची बाब उघड झाली. हे बँक खाते 'कांचन जनरल स्टोअर आणि होलसेलर' यांच्या नावावर होते.


त्यानंतर पोलिसांनी नागपूरला जाउन बँकेतील खातेदार कांचन मेश्राम यांची चौकशी केली. तेव्हा कांचन मेश्रामची मैत्रिण सलमा अली हिने मेश्रामच्या कागदपत्रांचा वापर करून बँकेत खाते उघडल्याचे निष्पन्न झाले. चौकशीदरम्यान कांचन मेश्राम यांनी सांगितले की, सलमा अलीने माझ्या कागदपत्रांचा वापर करून बँक खाते उघडले. त्याचा वापर लोकांना फसवण्यासाठी केला.


आपल्या कागदपत्रांचा वापर चुकीच्या कामांसाठी करण्यात आल्याचे लक्षात येताच कांचन मेश्राम यांनी १५ ऑक्टोबरला सलमा सुजात अली (वय ३८) आणि गजेंद्र एकुणकर (वय ३९) यांच्याविरोधात नागपुरातील पार्डी पोलीस ठाण्यात स्वतंत्र एफआयआर दाखल केला आहे. तसेच पोलिसांनी या बँक खात्याची माहिती घेतली असता दोन दिवसांत तब्बल ३ कोटी रुपये यात जमा झाल्याचे समोर आले.


सलमा अलीच्या बँक खात्यात पैसे आहेत. मात्र त्यांचा या फसवणुकीशी कोणताही संबंध नाही, असा दावा कांचन यांच्या वकिलांनी केल. कांचन हिची मैत्रिण सलमा अली हिने ओळखीच्या कागदपत्रांचा वापर करून बँक खाते उघडले. सलमाने या खात्याचा वापर फसव्या हेतूने केल्याचा दावा मेश्राम यांनी केला. हेमांगी झुनझुनवाला यांनी फसवणुकीची तक्रार केल्यानंतर त्याप्रकरणी तपास केला असता, एका बँक खात्यात जास्तीत जास्त रक्कम ट्रान्सफर झाल्याचे समोर आले. त्यानंतर ते बँक खाते गोठवण्यात आले.


तसेच आरोपी सलमा अली आणि तिचा सहकारी गजेंद्र एकुणकर यांना पोलिसांनी अटक करून नागपूर येथून मुंबईत आणले. सध्या दोघेही कोठडीत आहेत. सलमा अली हा आर्याचा पोज देऊन झुनझुनवालाशी बोलत असल्याचेही समोर आले. त्यानंतरच्या तपासात या दोघांनी केलेल्या घोटाळ्याची एकूण किंमत ३ कोटी रुपये असल्याचे उघड झाले. त्यातील ५५.३५ लाख रुपये रक्कम हेमांगी झुनझुनवाला यांची आहे. आता न्यायालयाच्या आदेशावरून पुन्हा पैसे कधी मिळतील, या आशेवर हेमांगी असून, या दोघांनी आणखी कोणाकोणाला फसविले याचा शोध सुरू करण्यात आला आहे.



maheshom108@ gmail.com

Comments
Add Comment