मुंबई: भारताच्या महिला संघाने(indian women team) पहिल्या टी-२०मध्ये ऑस्ट्रेलियावर दमदार विजय मिळवला आहे. आधी तितस साधूने भारतासाठी चार विकेट घेतल्या. यानंतर फलंदाजी स्मृती मंधाना आणि शेफाली वर्मा यांनी कमाल करताना भारताला ९ विकेटनी विजय मिळवून दिला. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी-२० सामना नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियममध्ये खेळवण्यात आला. यात भारताने १७.४ षटकांत १ विकेट गमावत विजय आपल्या नावे केला.
भारतासाठी शेफाली वर्माने ६ चौकार आणि ३ षटकार लगावत ४४ धावा केल्या. याशिवाय स्मृती मंधानाने ७ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ५४ धावा केल्या. सामन्यात भारताने टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्यांदा बॅटिंगसाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियाचा डाव १९.२ षटकांत १४१ धावांवर आटोपला. कांगारूच्या संघासाठी फोएबे लिचफील्डने सर्वाधिक ४९ धावांची खेळी केली. भारतासाठी तितस साधूने सर्वाधिक ४ विकेट मिळवल्या.
या दरम्यान तिने ४ षटकांत ४.२०च्या इकॉनॉमीने १७ धावा खर्च केल्या. त्यानंतर आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघासाठी स्मृती मंधाना आणि शेफाली वर्मा यांनी शानदार बॅटिंग करत सामना एकतर्फी केला.
भारताने सहज गाठले लक्ष्य
१४२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतासाठी स्मृती मंधाना आणि शेफाली वर्माने पहिल्या विकेटसाठी १३७ धावांची भागीदारी केली. ही भागीदारी १६व्या षटकांत तुटली. मंधानाने ५२ चेंडूत ७ चौकार आणि १ षटकार लगावत ५४ धावा केल्या. याशिवाय सहकारी सलामीवीर शेफाली वर्माने ४४ चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकार ठोकत ६४ धावांची नाबाद खेळी केली.