Thursday, May 15, 2025

देशमहत्वाची बातमी

Aditya-L1: इस्त्रोने रचला इतिहास, आदित्य एल१ची यशस्वी कामगिरी

Aditya-L1: इस्त्रोने रचला इतिहास, आदित्य एल१ची यशस्वी कामगिरी

नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्थने इतिहास रचला आहे. इस्त्रोची पहिली सूर्य मोहीम आदित्य एल १ने शनिवारी लँग्रेस पॉईंटमध्ये दाखल झाले. सप्टेंबर २०२३मध्ये आंध्र प्रदेशच्या श्रीहरिकोटा येथून लाँच करण्यात आले होते. आज आदित्य एल १ने शेवटची आणि खूपच कठीण प्रक्रिया पार केली.


या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीट केले, भारताने एक माईलस्टोन पूर्ण केला आहे. भारताची पहिली सोलर ऑब्झर्वेटरी आदित्य एल १ आपल्या पहिल्या लक्ष्यापर्यंत पोहोचली आहे. ही सगळ्यात कठीण मोहीमपैकी एक साकारण्यात आपल्या वैज्ञानिकांनी अथक परिश्रम केले आहेत. मी देशवासियांसोबत या असाधारण उपलब्धीसाठी त्यांचे कौतुक करतो.



इस्त्रोने दिले मोठे अपडेट


इस्त्रोने आपल्या विधानात म्हटले की आदित्य एल १चे हॅलो ऑर्बिट इंसर्शन ६ जानेवारी २०२४ला संध्याकाळी ४ वाजता प्रभामंडळात कक्षेत स्थापित झाले आहे. इस्त्रोने एका विधानात म्हटले की आदित्य एल १चे हॅलो ऑर्बिट ६ जानेवारी २०२४ला संध्याकाळी ४ वाजता प्रभामंडळ कक्षेत स्थापित झाले आहे.

 

Comments
Add Comment