
मुंबई: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जाणरा आहे. दोन्ही संघादरम्यानच्या मालिकेतील पहिला सामना ११ जानेवारीला खेळवला जाणार आहे. या मालिकेतील मोठी अपडेट समोर आली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अफगाणिस्तानविरुद्ध टी-२० मालिकेत रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृ्त्व करणार आहे. सोबतच विराट कोहलीही अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत खेळताना दिसू शकतो.
रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघेही गेल्या वर्षभरापासून भारतासाठी टी-२० सामन्यात खेळलेले नाहीत. मात्र अफगाणिस्तान मालिकेतून ते पुनरागमन करू शकतात.
रोहित शर्मा आणि विराट कोहलीचे खेळणे निश्चित!
भारतीय टी-२० संघात रोहित शर्मा आणि विराट कोहलीचे पुनरागमनावर सातत्याने सस्पेंस कायम आहे. मात्र मीडिया रिपोर्ट्सनुसार अफगाणिस्तान मालिकेतून दोन्ही दिग्गजांचे पुनरागमन शक्य आहे.
भारत वि अफगाणिस्तान मालिका
११ जानेवारी पहिला टी २० सामना, मोहाली
१४ जानेवारी दुसरा टी२० सामना, इंदौर
१७ जानेवारी तिसरा टी-२० सामना, बंगळुरू
सर्व सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी सात वाजता सुरू होतील.