
मुंबई: दाक्षिणात्य सुपरस्टार धनुषचा बहुप्रतिक्षित सिनेमा कॅप्टन मिलरचा दमदार ट्रेलर रिलीज केला आहे. यात तो धोकादायक भूमिकेत दिसत आहे. त्याचा हा नवा अवतार पाहून अंगावर शहारे येतील. कॅप्टन मिलर सिनेमाच्या ट्रेलरमध्ये धनुष अॅक्शन अवतारात दिसत ाहे. याशिवाय त्याच्या लुकचेही जोरदार कौतुक होत आहे.
अॅक्शन अवतारात सुपरस्टार धनुष
धनुषने कॅप्टन मिलरमधील आपल्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तो लांब केस आणि वाढलेल्या दाढीमध्ये दिसत आहे. २.५४ सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये तुम्ही पाहू शकता की धनुष एकटाच इंग्रजांविरुद्ध लढसत आहे. तो कधी शत्रूवर गोळ्यांचा वर्षाव करतो तर कधी धारदार तलवारीने त्यांना मृत्यूच्या घाटात उतरवतो. ट्रेलर पाहून समजते की तो एका गावाला प्रोटेक्ट करत आहे.
या दिवशी होणार रिलीज
धनुषचा सिनेमा कॅप्टन मिलरचे दिग्दर्शन अरूण माथेश्वरन यांनी केले आहे. यात धनुषशिवाय प्रियंका अरूल मोहन, शिवराज कुमार, निवेदिता सतीश, विनायकन आणि संदीप किशन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. कॅप्टन मिलर हा सिनेमा हिंदीसह अनेक दाक्षिणात्य भाषांमध्ये १२ जानेवारीला रिलीज होत आहे.