Tuesday, April 29, 2025

देशमहत्वाची बातमी

भारतीय नौदलाची धाडसी कारवाई, अपहरण झालेल्या जहाजातून १५ भारतीयांची सुटका

भारतीय नौदलाची धाडसी कारवाई, अपहरण झालेल्या जहाजातून १५ भारतीयांची सुटका

नवी दिल्ली: भारतीय नौदलाने(indian navy) शुक्रवारी धाडसी कारवाई करताना सोमालियाजवळ अपहरण करण्यात आलेल्या एमव्ही लीला नारफॉक या जहाजावरील १५ भारतीयांना सुखरूप सोडवले. समुद्री चाच्यांकडून या जहाजाचे अपहरण करण्यात आले होते मात्र भारताच्या नौदलाने धडाकेबाज कारवाई करताना या जहाजावरील १५ भारतीयांची सुखरूप सुटका केली तसेच इतर सहा क्रू कर्मचाऱ्यांचीही सुटका करण्यात आली.

 

नौदलाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर अरबी समुद्रात एमव्ही लीला नॉरफोक या जहाजाचे अपहरण झाल्याची माहिती भारतीय नौदलाला मिळाली. त्यानंतर तातडीने ही कारवाई करण्यात आली. भारतीय नौदलाचे प्रमुख अॅडमिरल आर हरी कुमार यांनी या अपहरण कर्त्यांविरोधात कारवाईचे आदेश भारताच्या युद्धनौकांना दिले. त्यानंतर येथील जहाजावरील १५ भारतीयांसह २१ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली. नौदलाच्या मार्कोस कमांडर्सकडून ही कारवाई करण्यात आली.

 

दरम्यान, जहाजावर शोधमोहीम घेतली असताना नौदलाला येथे समुद्री चाचे आढळले नाहीत. या चाच्यांनी जहाजावर गोळीबार केला आणि त्यानंतर ते आश्रय घेऊन लपून बसले होते अशी माहिती सुटका झालेल्या सदस्यांनी दिली.

Comments
Add Comment